Home /News /career /

विद्यार्थ्यांनो, पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडू नका; 'ही' आहेत देशातली सर्वांत कमी फी असलेली 10 कॉलेजेस

विद्यार्थ्यांनो, पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडू नका; 'ही' आहेत देशातली सर्वांत कमी फी असलेली 10 कॉलेजेस

देशातील सर्वात कमी फी असणारी कॉलेजेस

देशातील सर्वात कमी फी असणारी कॉलेजेस

इंडिया टुडे मॅगझिन आणि एमडीआरए या दोन संस्थांनी एक सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाच्या आधारे देशात सर्वांत कमी शैक्षणिक शुल्क असलेल्या कॉलेजेसची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    मुंबई, 07 जुलै:   गेल्या काही दिवसांत देशभरातल्या वेगवेगळ्या बोर्ड्सचे दहावी-बारावीचे निकाल (Results) जाहीर झाले आहेत. त्यामुळे सध्याचे दिवस प्रवेशाच्या गडबडीचे आहेत. अर्ज करण्यापासून प्रत्यक्ष मेरिट लिस्टमध्ये (Merit List) नाव येईपर्यंत अनेक टप्पे असतात. आपल्या मुलाला प्रवेश मिळणार हे निश्चित झालं, की पालकांची धावपळ जरा जास्तच वाढते. कारण पैसे अर्थात फी भरल्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नसतो. काही कोर्सेसची, काही कॉलेजेसची फी खूप जास्त असते. तसाही गेल्या काही काळात शिक्षणाचा खर्च एकंदरीतच खूप वाढला आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बिझनेस बुडाले. त्यामुळे खूप जणांचं आर्थिक नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर आधीच महागडं असलेलं शिक्षण आणखीच महागडं वाटू लागलं. चांगलं कॉलेज मिळालं तर फी जास्त असणं साहजिकच असतं. ज्यांना हे शक्य होणार नसतं त्यांचं काय? असे पालक आपल्या मुलांसाठी कमी शैक्षणिक शुल्कात (Best Colleges having lowest fees) चांगलं शिक्षण देणाऱ्या कॉलेजेसच्या शोधात असतात. नेमकी हीच बाब ओळखून इंडिया टुडे मॅगझिन आणि एमडीआरए या दोन संस्थांनी एक सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाच्या आधारे देशात सर्वांत कमी शैक्षणिक शुल्क असलेल्या कॉलेजेसची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. #AatmanirbharBharat की आत्मनिर्भर नारी! रेल्वे रुळावर उतरून काम करणाऱ्या महिलेचा Video रेल्वे मंत्रालयाने केला पोस्ट कॉलेजेसची प्रवेश क्षमता, प्रशासन, शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा, व्यक्तिमत्त्व विकासासाठी केले जाणारे प्रयत्न, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट्स अशा अनेक निकषांच्या आधारे चांगल्या आणि कमी फी असलेल्या कॉलेजेसची यादी 'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केली आहे. ती सोबत देत आहोत. या कॉलेजेसमध्ये शिक्षण घेऊन गरजू विद्यार्थी चांगलं भविष्य घडवू शकतात. या सर्वेक्षणाबद्दल माहिती देणारं वृत्त 'आज तक'ने प्रसिद्ध केलं आहे. सर्वांत कमी फी असलेली देशातली टॉप टेन कॉलेजेस पुढे दिली आहेत. त्या त्या कॉलेजची पूर्ण कालावधीची कोर्स फी कॉलेजच्या नावापुढच्या कंसात दिली आहे. राणी अन्ना गव्हर्न्मेंट कॉलेज फॉर वूमन, तिरुनेलवेली, तमिळनाडू (3200 रुपये), एपीसी महालक्ष्मी कॉलेज फॉर वूमन, थूतुकुडी (3459 रुपये), श्री जीवीजी विशालाक्षी कॉलेज फॉर वूमन (स्वायत्त), उदुमलपेट, तमिळनाडू (3645 रुपये), सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींचं एस. डी. आर्ट, व्ही. एस. आपटे कॉमर्स आणि एमएच मेहता सायन्स कॉलेज, पालघर (3725 रुपये), ऑल सेंट्स कॉलेज, तिरुअनंतपुरम (4455 रुपये), बेथून कॉलेज, कोलकाता (5100 रुपये), धेमाजी गर्ल्स कॉलेज, धेमाजी, आसाम (5360 रुपये), सेंट झेवियर्स कॉलेज फॉर वूमन, अलुवा, एर्नाकुलम (5571 रुपये), विमला कॉलेज (स्वायत्त), त्रिशूर (5625 रुपये), गव्हर्न्मेंट आर्ट्स कॉलेज (स्वायत्त), सेलम, तमिळनाडू (5675 रुपये)
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Education

    पुढील बातम्या