मराठी बातम्या /बातम्या /करिअर /कोरोनाकाळात तुमचाही जॉब गेलाय का? चिंता करू नका. 'या' टिप्स नक्की फॉलो करा

कोरोनाकाळात तुमचाही जॉब गेलाय का? चिंता करू नका. 'या' टिप्स नक्की फॉलो करा

या काळाचा सदुपयोग कसा करून घेणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

या काळाचा सदुपयोग कसा करून घेणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

या काळाचा सदुपयोग कसा करून घेणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

मुंबई, 06 जुलै: गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढतच चाललं आहे. मागील काही काळात बाजारपेठा (Markets) आणि ऑफिसेस (Offices) बंद असल्यामुळे अनेकांना आपला जॉब गमवावा (lost jobs) लागला आहे. कुटुंबीयांची जबाबदारी असल्यामुळे आणि त्यात हातात जॉब नसल्यामुले अनेकजण नैराश्यात (Depression) जात आहेत. हाताला काम नसल्यामुळे नाही नाही ते विचार येत आहेत. घरी पैशांची चणचण भासत आहे. या सर्व समस्या असतानाही जिद्दीनं नवीन नोकरी (New jobs) कशी मिळणार आणि या काळाचा सदुपयोग कसा करून घेणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

स्वतःवर विश्वास ठेवा

नोकरी गेल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास  (Self Confidence). लक्षात ठेवा तुमची नोकरी तुमच्या चुकीमुळे गेलेली नाही . तर परिस्थितीमुळे गेली आहे. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. ही गोष्ट स्वतःच्या मनामध्ये ठेवा की आपल्याला लवकरच नवीन नोकरी मिळेल. अशा परिस्थितीत दुसर्‍याच्या दबावात येऊ नका. जर आपल्या आसपासचे लोक आपलं मनोबल कमी कर्तब असतील तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा.

हे वाचा - MPSC Special: कोरोनानं हिरावलं पालकांचं छत्र; नियुक्तीही नाही; मग जगायचं कशासाठी

आपले कॉन्टॅक्टस वाढवा

एकच नोकरी करत असताना आपण  स्वत: ला इतर क्षेत्रातील किंवा प्रतिस्पर्धी कंपनीतील लोकांपासून दूर ठेवतो. तसंच आपल्या माजी कर्मचारी आणि बॉसशी संपर्कठेवत नाही. मात्र असं करू नका. नोकरी सोडल्यानंतर सगळ्यात पहिले आपले कॉन्टॅक्टस (Contacts) वाढवा. लोकांशी बोलणं सुरू करा. यामुळे तुम्हाला नवीन जॉब मिळण्यास मदत होऊ शकते.

सतत अपडेट राहा

आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे काय चाललं आहे, कशाची गरज आहे, आपल्या क्षेत्रात नवीन काय आहे याबद्दल सात अपडेट राहा.तुम्ही जर अपडेट (Update)असाल आणि नवनवीन गोष्टी शिकत असाल तर तुम्हाला नवीन नोकरी मिळण्यास थोडाही उशीर होणार नाही.

व्यसनाच्या दूर राहा

नोकरी गेल्यामुळे अनेकजण नैराश्यात जातात. तसंच टेन्शनमुळे आणि इतर वाईट लोकांच्या सहवासात राहण्यास सुरुवात करतात. यामुळे दारू, सिगारेट या गीष्टींची व्यसन लागू शकतं. मात्र या सर्व गोष्टींपासून दूर राहा. कुटुंबासह मनमोकळा वेळ घालवा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Corona, Jobs