मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात शहरभरात कौतुक अन् वाह वा; मात्र सत्य काहीतरी वेगळच!

UPSC उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात शहरभरात कौतुक अन् वाह वा; मात्र सत्य काहीतरी वेगळच!

मीडियापासून विविध विभागाकडून तिचं कौतुक करण्यात आलं, अनेक ठिकाणी तिचा गौरवही झाला..मात्र...

मीडियापासून विविध विभागाकडून तिचं कौतुक करण्यात आलं, अनेक ठिकाणी तिचा गौरवही झाला..मात्र...

मीडियापासून विविध विभागाकडून तिचं कौतुक करण्यात आलं, अनेक ठिकाणी तिचा गौरवही झाला..मात्र...

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 04 जून : जोपर्यंत तुम्ही डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवू नका, असं नेहमी म्हटलं जातं. ही बाब झारखंडच्या रामगड जिल्ह्यात राहणाऱ्या 24 वर्षीय दिव्या पांडे हिला पूर्णपणे लागू होते. UPSC चा निकाल (UPSC result 2022) आल्यानंतर दिव्या पांडे हिचं खूप कौतुक होत होतं. दिव्या पांडे आणि तिच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, पहिल्याच प्रयत्न दिव्याने यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलं. मात्र आता सत्य समोर आलं आहे. यानंतर दिव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी माफी मागितली आहे.

काय आहे प्रकरण? 

दिव्या पांडे आणि तिच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, मुलीने पहिल्याच प्रयत्नात UPSC च्या परीक्षेत यश मिळवलं. याशिवाय 323 वी रँक आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. यानंतर रामगडमध्ये ही बातमी पसरली. मीडियानेही तिचं खूप कौतुक केलं. काही विभागांकडून तिला गौरवण्यात देखील आलं.

मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला. एकसारखीच दोन नावं असल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. खरं म्हणजे झारखंडची दिव्या पांडे नाही तर दक्षिण भारतात राहणारी दिव्या पी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिलाच या परीक्षेत 323 वी रँक मिळाल्याचं सांगितलं जात आहे. सत्य समोर आल्यानंतर दिव्या पांडे (24) आणि तिच्या कुटुंबीयांकडून माफी मागण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकला असता, मात्र अद्याप या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

श्रुती शर्माने देशभरातून पहिली

सोमवारी, 30 मे 22 रोजी नागरी सेवा परीक्षांचा 2021 (UPSC) निकाल जाहीर झाला. उत्तर प्रदेशमधील श्रुती शर्माने संपूर्ण देशभरातून पहिला क्रमांक (AIR 1) मिळवला. श्रुती शर्माला भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) रुजू होऊन देशाची सेवा करायची आहे. तिने दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवीचे तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथील रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमीमध्ये (RCA) तिने नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती. त्यामुळे ही निवासी कोचिंग अकादमी आता प्रचंड चर्चेत आली आहे.

First published:

Tags: Jharkhand, Upsc