मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

उमेदवारांनो, शिक्षण नसेल तरी चालेल; 'या' जिल्ह्यात 13,000 रुपये पगाराची नोकरी; इथे पाठवा अर्ज

उमेदवारांनो, शिक्षण नसेल तरी चालेल; 'या' जिल्ह्यात 13,000 रुपये पगाराची नोकरी; इथे पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

कोल्हापूर, 11 मे: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर (Kolhapur District Sainik Welfare Office Kolhapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. लिपिक, वीजतंत्री, ड्रायव्हर, सफाई कर्मचारी (पुरुष), सफाई कर्मचारी (स्त्री) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

लिपिक (Clerk)

वीजतंत्री (Electrician)

ड्रायव्हर (Driver)

सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man)

सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman)

राज्याच्या जलसंपदा विभागात 'या' पदांसाठी जागा रिक्त; रिटायर्ड अधिकाऱ्यांना संधी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

लिपिक (Clerk) - उमेदवारांनी मराठी आणि इंग्रजी टायपिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT चा कम्प्युटर कोर्स केला असणं आवश्यक आहे.

वीजतंत्री (Electrician) - उमेदवारांनी इलेक्ट्रिकलमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ड्रायव्हर (Driver) - उमेदवारांह्या शिक्षणाबद्दल मी,ताहिती देण्यात आलेली नाही. उमेदवारांकडे RTO पास लायसन्स असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) - उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) - उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

लिपिक (Clerk) - 13,600/- रुपये प्रतिमहिना

वीजतंत्री (Electrician) - 13,500/- रुपये प्रतिमहिना

ड्रायव्हर (Driver) - 13,500/- रुपये प्रतिमहिना

सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) - 13,000/- रुपये प्रतिमहिना

सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) - 13,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006.

MahaGenco मध्ये तब्बल 2,28,745.रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा Apply

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 मे 2022

JOB TITLEDistrict Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीलिपिक (Clerk) वीजतंत्री (Electrician) ड्रायव्हर (Driver) सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवलिपिक (Clerk) - उमेदवारांनी मराठी आणि इंग्रजी टायपिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT चा कम्प्युटर कोर्स केला असणं आवश्यक आहे. वीजतंत्री (Electrician) - उमेदवारांनी इलेक्ट्रिकलमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ड्रायव्हर (Driver) - उमेदवारांह्या शिक्षणाबद्दल मी,ताहिती देण्यात आलेली नाही. उमेदवारांकडे RTO पास लायसन्स असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) - उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) - उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारलिपिक (Clerk) - 13,600/- रुपये प्रतिमहिना वीजतंत्री (Electrician) - 13,500/- रुपये प्रतिमहिना ड्रायव्हर (Driver) - 13,500/- रुपये प्रतिमहिना सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) - 13,000/- रुपये प्रतिमहिना सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) - 13,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://kolhapur.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Kolhapur