मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Army Jobs: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सशस्त्र सैन्यदलात बंपर पदभरती; 'या' पदासांठी आजच करा अर्ज

Army Jobs: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सशस्त्र सैन्यदलात बंपर पदभरती; 'या' पदासांठी आजच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

नवी दिल्ली, 10 जुलै: भारतीय सैन्यदलाच्या अंतर्गत येणाऱ्या सशस्त्र सैन्यदलाच्या वैद्यकीय सेवा महासंचनालयात (DGAFMS Recruitment 2021) दहावी उत्तीर्ण (10th jobs) आणि काही विशेष काम अवगत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर (Stenographer), इलेक्ट्रिशिअन (Electrician), आचारी (Cook), न्हावी (Barber) अशा एकूण तब्बल 89 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

स्टेनोग्राफर ग्रेड-II - 01

निम्न श्रेणी लिपिक (LDC) - 03

स्टोअर कीपर - 14

हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन - 01

सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II - 01

फायरमन - 04

ट्रेड्समन मेट - 32

कुक  - 01

बार्बर - 02

कॅन्टीन बेयरर  - 01

वॉशर मॅन  - 02

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - 27

एकूण जागा - 89

शैक्षणिक पात्रता

स्टेनोग्राफर ग्रेड-II - 12वी उत्तीर्ण आणि कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणं आवश्यक

निम्न श्रेणी लिपिक (LDC) - 12वी उत्तीर्ण आणि इंग्रजी, हिंदी टायपिंग अनिवार्य

स्टोअर कीपर - 12वी उत्तीर्ण आणि इंग्रजी, हिंदी टायपिंग अनिवार्य

हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन - 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये अनुभव.

फायरमन - 10वी उत्तीर्ण आणि शारीरिक क्षमता

ट्रेड्समन मेट - 10वी उत्तीर्ण

हे वाचा - Job Alert: MSRTC मध्ये ITI आणि इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी

कुक  - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये अनुभव.

बार्बर - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये अनुभव.

कॅन्टीन बेयरर  - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये अनुभव.

वॉशर मॅन  - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये अनुभव.

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये अनुभव.

असा करा अर्ज

जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार A4 कागदावर टाईप केलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25 आणि  02 फोटो तसंच आवश्यक कागदपत्रं जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

उमेदवारांना अप्लाय करण्यासाठी संबंधित युनिट्स, डेपोचे कमांडंट किंवा कमांडिंग ऑफिसर यांच्याकडे अर्ज पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Indian army, Job alert, Jobs