'आमचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राध्यापक यांच्यामुळे दिल्लीत शैक्षणिक क्रांती घडून आली आहे. त्यांना आम्ही वेळोवेळी प्रशिक्षणासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसह परदेशातही पाठवत असतो. जेव्हा ते प्रशिक्षण घेऊन येतात, तेव्हा ते आणखी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येतात,' असं केजरीवाल यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. हेही वाचा- 24 तासात दोन नवजात मुलींची हत्या, 1 दिवसाच्या बाळाचं आईनंच दाबलं उशीनं तोंड शिक्षण संचालनालयाने (Education Directorate) केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'सर्वोत्कृष्टतेचा आमचा शोध निरंतर सुरू आहे. दिल्लीच्या सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांचा एक गट अहमदाबादमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM-Ahmedabad) या संस्थेत पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाला आहे. लीडरशिप फॉर एक्सलन्स इन एज्युकेशन ट्रेनिंग असं या प्रशिक्षण कार्यक्रमाचं नाव आहे. या प्रकारचे नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आम्हाला सातत्याने नवे मापदंड प्रस्थापित करण्यास प्रोत्साहन देतात.' हेही वाचा- शिर्डी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत, अधिकाऱ्यानं महिला साईभक्तांना पाठवले अश्लील Video शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यास त्याचे चांगले परिणाम पुढच्या पिढीवर दिसून येतात. कारण आपल्या देशाचं भविष्य पुढच्या पिढीच्या हातात आहे. त्यामुळे या पुढच्या पिढीला शिकवणारी आजच्या शिक्षकांची पिढीही तितकीच स्मार्ट आणि आताच्या काळातल्या आव्हानांना समजून घेणारी, पेलणारी असणं अपेक्षित आहे. म्हणूनच दिल्ली सरकारकडून शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सरकारी शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षणाच्या तंत्रामध्ये नवे बदल करण्याचं काम केलं जात आहे. दिल्लीच्या शिक्षण क्षेत्रातल्या या प्रयत्नांचा आदर्श अन्य राज्यंही घेण्याचा प्रयत्न करत आहेत.दिल्ली शिक्षा क्रांति हमारे टीचर्ज़ और प्रिन्सिपल की वजह से हुई है। इन्हें हम समय समय पर IIM और विदेशों में बेहतर से बेहतर ट्रेनिंग के लिए भेजते हैं। जब ये लौटते हैं तो पूरी ऊर्जा और उत्साह से भरे होते हैं। https://t.co/9tmaf71Pmd
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 21, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Delhi