मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

'या' विद्यापीठातून पास होणाऱ्याची नोकरी पक्की, पुढच्या वर्षापासून मिळणार लाभ

'या' विद्यापीठातून पास होणाऱ्याची नोकरी पक्की, पुढच्या वर्षापासून मिळणार लाभ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. या महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. Delhi Skill and Entrepreneurship University असं या विद्यापीठाचं नाव असून पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात या विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. या विद्यापीठातून कंपन्यांना मनुष्यबळ पुरवलं जाणार आहे. या विद्यापीठाची स्थापना दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिनियमानुसार करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, या विद्यापीठाविषयी माहिती देताना खूप आनंद होत आहे. आज या विद्यापीठाची पहिली बैठक पार पडली आहे. यामध्ये कुलपती आणि बोर्डाच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. हे वाचा-मंदीत संधी! पोस्टामध्ये 1300 पेक्षा जास्त जागांसाठी भरती! कसा करायचा अर्ज? या महाविद्यालयाच्या स्थापनेमागे केवळ प्रत्येकाला रोजगार मिळवून देणं हाच उद्देश आहे. तसंच नवीन व्यापार करण्यासाठी त्यांना सक्षम करणं हा देखील यामागील उद्देश आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना कौश्यल्य आणि प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या माध्यमातून याठिकाणी शिकत असतानाच रोजगार मिळवू शकतील. यासाठी सरकारने कंबर कसली आहे.’ सरकारने यासाठी आयआयएम-अहमदाबादमधील सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिपच्या प्रमुख डॉ. निहारिका व्होरा यांची कुलपती म्हणून निवड केली आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाच्या बोर्ड सदस्यांमध्ये अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे संस्थापक डीन प्रमथ राज सिन्हा, जॅनपॅक्टचे संस्थापक प्रमोद भसीन, नोकरी डॉटकॉमचे संस्थापक संजीव बिखचंदानी, उद्योजक श्रीकांत शास्त्री आणि आयपी विद्यापीठाचे संस्थापक के. के. अग्रवाल यांचा समावेश आहे. पहिल्या सत्राविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, ‘या विद्यापीठामध्ये गुणवत्ता आणि योग्य शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांशी करारदेखील करण्यात येणार आहेत.’
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या