मुंबई, 07 ऑगस्ट : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (DRDO) या संस्थेनं मुलींना इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्काॅलरशिप द्यायचं ठरवलं आहे. त्यासाठी DRDO अण्डर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियरिंग करणाऱ्या विद्यार्थिंनींना स्काॅलरशिप देणार आहे. संस्थेला वाटतंय की जास्तीत जास्त मुलींनी इंजिनियरिंग क्षेत्रात यावं यासाठी हे पाऊल उचललंय.
या स्काॅलरशिप अंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या विद्यार्थिनींना दर वर्षी 1.2 लाख रुपयापर्यंत स्काॅलरशिप मिळेल. ही स्काॅलरशिप एअरोस्पेस, एरोनाॅटिकल इंजिनियरिंग, स्पेस इंजिनियरिंग आणि एअरक्राफ्ट इंजिनियरिंग या विषयांमध्ये दिली जाईल.
RBI ची गिफ्ट! रेपो रेटमध्ये झाली कपात, आता EMI होईल 'इतका' कमी
अशी होईल निवड प्रक्रिया
पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम (MTech/ME)साठी विद्यार्थिनींना गेटच्या स्कोअरवर स्काॅलरशिप दिली जाईल.
अण्डर ग्रॅज्युएट प्रोग्रॅम (BTech/BE)साठी विद्यार्थिनींना JEE (Main)च्या मेरिटच्या आधारावर स्काॅलरशिप दिली जाईल.
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीनं आदेश भाऊजींना सांगितली 'ही' गोष्ट
असा करा अर्ज
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालीय.ती 10 सप्टेंबरपर्यंत चालेल. विद्यार्थिनींनी ऑफिशियल वेबसाइट drdo.gov.in वर अर्ज सादर करावा.
दरम्यान, तुम्हाला मोदी सरकारच्या प्रगती स्कीमबद्दल माहीत आहे का? आर्थिक अडचणींमुळे आता तुमच्या मुलीचं शिक्षण संपायला नको. या योजनेत हुशार मुलींना 50 हजार रुपयांची स्काॅलरशिप मिळते. ही स्काॅलरशिर टेक्निकल शिक्षणासाठी मिळते. या योजनेअंतर्गत AICTE च्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर वर्षाला 50 हजार रुपयांची स्काॅलरशिप दिली जाते. यात 30 हजार रुपये ट्युशन फी म्हणून देतात आणि 20 हजार रुपये दुसऱ्या खर्चांसाठी दिले जातात.
RIL आणि BP मध्ये नवा करार, 5 वर्षात उघडणार 5,500 पेट्रोल पंप
नव्या योजनेत टेक्निकल शिक्षणात पदवी आणि पदविका घेणाऱ्या विद्यार्थिंनींना दर वर्षी स्काॅलरशिप दिली जाते. पण त्यासाठी काही नियम असतात.
दर वर्षी 4 हजार मुलींच्या शिक्षणासाठी पैसे मिळतील. त्यात 2 हजार रुपये डिप्लोमा कोर्ससाठी आणि बाकी 2 हजार डिगरी कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनींना मिळतात.
AICTE ची मान्यता असलेल्या टेक्निकल इन्स्टिट्युटमधून डिप्लोमा आणि डिगरी मिळवणाऱ्या मुलींना स्काॅलरशिप मिळते.
VIDEO: ट्रॅकवर येऊन थेट गजराजाने रोखली ट्रेन