मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

एकाच घरी दोन अधिकारी! गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कन्येनं क्रॅक केली UPSC परीक्षा; विद्यार्थ्यांना दिला 'हा' मंत्र

एकाच घरी दोन अधिकारी! गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कन्येनं क्रॅक केली UPSC परीक्षा; विद्यार्थ्यांना दिला 'हा' मंत्र

 जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या कन्येनंही UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या कन्येनंही UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या कन्येनंही UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

गोंदिया, 25 संप्टेंबर: Civil Services Exam 2020 UPSC चा निकाल (UPSC result 2021) नुकताच जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील तब्बल 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कित्येक वर्षांची प्रचंड मेहनत आणि जिद्द मनात बाळगूनच (Success story) या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी अगदी सहजपणे मुलाखत देऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे तर काही विद्यार्थ्यांना मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाखतीला यश (UPSC success story) मिळालं आहे. या निकालानं गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे (Gondia Collector Nayna Gunde) यांचा आणि त्यांच्या मुलीचाही आनंद द्विगुणित केला आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या कन्येनंही UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

दिव्या गुंडे असं गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कन्येचं नाव आहे. दिव्यानं परिश्रमानं आणि जिद्दीनं अनेक वर्ष अभ्यास करून UPSC परीक्षा क्रॅक केली आहे.  दिव्यानं या परीक्षेत संपूर्ण भारतातून 338 वी रँक प्राप्त केली आहे. त्यामुळे तिचं संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून कौतुक होत आहे. मात्र हे सगळं यश इतकं सोपं नाही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच आनंद होतोय असं दिव्यानं म्हंटलं आहे.

हे वाचा - वडिलांच्या जागी काम करणाऱ्या मिन्नूने घडवला इतिहास, UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश

दिव्यानं ऑक्टोबर 2020 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यानंतर 21 सप्टेंबर 2021 ला तिची UPSC ची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत घवघवीत यश मिळवत तिनं ही परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली आहे. आपल्या यशाचं श्रेय तिनं आपल्या आई वडील आणि शिक्षकांना दिलं आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वांनी तिचं अभिनंदन केलं आहे.

विद्यार्थ्यांना दिला हा कानमंत्र

"UPSC चा संपूर्ण प्रवास हा खूप चढ-उतारांनी भरलेला असतो. त्यामुळे जर UPSC मध्ये टिकून राहायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिकून राहणं. कोणत्याही अपयशाला खचून न जाता सतत स्वतःला मोटिव्हेट करत राहणं. तसंच आपल्या आजूबाजूला प्रोत्साहन देणारे, आत्मविश्वास वाढवणारे आणि समजून घेणारे असे काही लोकं असणं महत्त्वाचं असतं, यामुळेच यश मिळत. माझी प्रेरणा माझे आई-बाबाच होते त्यामुळे मला यश मिळू शकलं." असं दिव्या सांगते.

हे वाचा - Success Story: अवघ्या 21 वर्षांच्या वयात 'तिनं' क्रॅक केली UPSC परीक्षा

ही तर प्रत्येक पालकांची इच्छा

आपल्या पाल्यांनी यश मिळवावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्याप्रमाणे माझ्या मुलीनंही प्रचंड मेहनतीनं यश मिळवलं. यात आमहाला सर्वांनाच आनंद आहे" असं गोंदियाच्या जिल्हाधिकारी आणि दिव्याच्या आई नयना गुंडे यांनी म्हंटलं आहे.

First published:

Tags: Success stories