मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी घोषणा! JEE Mains परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांचा मुहूर्त ठरला; 'या' तारखांना होणार परीक्षा

मोठी घोषणा! JEE Mains परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांचा मुहूर्त ठरला; 'या' तारखांना होणार परीक्षा

आता केंद्र सरकारनं तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांसाठी परीक्षांची तारीख जाहीर केली आहे.

आता केंद्र सरकारनं तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांसाठी परीक्षांची तारीख जाहीर केली आहे.

आता केंद्र सरकारनं तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांसाठी परीक्षांची तारीख जाहीर केली आहे.

नवी दिल्ली, 06 जुलै : बहुप्रतीक्षित JEE Mains या परीक्षांच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांची (3rd and 4th phase) तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. या वर्षी कोरोना (Corona) महामारीमुळे JEE Mains ही परीक्षा चार सत्रांमध्ये घेण्यात येत आहे. पहिली परीक्षा फ्रेब्रुवारीमध्ये घेण्यात आली तर या परीक्षेचं दुसरं सत्र मार्चमध्ये घेण्यात आलं आहे. आता केंद्र सरकारनं तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांसाठी परीक्षांची तारीख (JEE Mains Exam dates) जाहीर केली आहे.

JEE Mains चं तिसरं सत्र 20 ते 25 जुलै दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे आणि चौथे सत्र यंदा 27 जुलै ते 02 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी आज केली आहे.

प्रिय विद्यार्थ्यांनो, ज्यासाठी तुम्ही सर्व जण बराच काळ वाट पाहत होते, आज संध्याकाळी 7 वाजता मी तुम्हाला सर्वांना JEE च्या तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षेसंबंधी माहितीची माहिती देईन.असं ट्विट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केलं होतं त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे.

JEE Mains च्या परीक्षांच्या तारखांची आता घोषणा करण्यात आली म्हणूनच आता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच आणि तयारी करण्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून करण्यात आलंय.

First published:
top videos