जयपूर, 17 जानेवारी : परीक्षा (Exam) छोटी असो वा मोठी त्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय परीक्षेसाठी चिकाटी हवी. राजस्थानमधून तीन बहिणींची एक कहाणी सध्या व्हायरल होत आहे. सर्वोदय विचार परीक्षेत नागोरच्या तीन बहिणींनी टॉप केलं आहे. या तिघीचं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आल्या. तस या चुलत-आते बहिणी आहेत. तिनही बहिणींमध्ये रितू सर्वात मोठी असून ती अकरावीत शिकते. रितूने जिल्ह्यात टॉप केलं आहे. तर सपना आणि कोमल या दोघींनी अनुक्रमे दुसऱा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. सपना रितूच्या काकांची मुलगी आहे तर कोमल आत्याची. रितूने सांगितलं की, या परीक्षेचा अभ्यासक्रम ऑनलाइन होता. ज्यात 12 पुस्तकांचा अभ्यासक्रम होता. आमच्याकडे लॅपटॉप नाहीये. म्हणून वडिलांनी त्याच्या नात्यातील एकाकडून लॅपटॉप आणला. यानंतर 12 पुस्तकांचा अभ्यासक्रम अवघ्या 40 दिवसात पूर्ण केला. या तिघी दिवसातील 4 ते 5 तास अभ्यास करतात. या परीक्षेत रितूने 100 पैकी 91, सपनाने 89 आणि कोमलने 87 मार्क मिळवले आहेत. रितूने सांगितलं की, परीक्षेत 100 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते. ज्यापैकी 90 प्रश्न सोडवायचे होते. तिघींनी 45 मिनिटात संपूर्ण पेपर सोडवला. हे ही वाचा-गर्दीत गेल्यावर तुमचाही Confidence कमी होतो? चिंता नको. 'या' टिप्स करा फॉलो राष्ट्रपिता महात्मा गांधींचे जीवन मुल्य आणि सिद्धांताविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी राज्यात 212 परीक्षा केंद्रात सर्वोदय विचार परीक्षा आयोजित केली जाते. बाल दिवसाच्या निमित्ताने आयोजित या परीक्षेत 58 हजार 676 विद्यार्थी सामील झाले होते. इयत्ता 9 ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप-2 च्या परीक्षेत 100 ऑब्जेक्टिव प्रश्न होते. यापूर्वी रितू जांगिड़ने प्रतिभा खोज परीक्षेत राज्यात सातवा नंबर पटकावला होता. या तिघींनी सांगितलं की, त्यांना अभ्यासासाठी कुटुंबाकडून पाठिंबा मिळत आहे. तिघी बहिणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून IAS होऊ इच्छितात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Ias officer, Inspiring story