मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CUET PG Result: ऑफिशिअल वेबसाईटवर आजच जारी होणार निकाल; ही घ्या डायरेक्ट लिंक

CUET PG Result: ऑफिशिअल वेबसाईटवर आजच जारी होणार निकाल; ही घ्या डायरेक्ट लिंक

ही घ्या डायरेक्ट लिंक

ही घ्या डायरेक्ट लिंक

CUET PG परीक्षा 1 सप्टेंबर 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 सप्टेंबर: कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (CUET PG) चा निकाल आज म्हणजेच 26 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता घोषित केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल बघू शकणार आहेत.

UGC अध्यक्ष जगदीश कुमार यांनी ट्विट केले की “नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) CUET-PG चा निकाल २६ सप्टेंबर (सोमवार) दुपारी ४ वाजता जाहीर करेल. सर्वांना हार्दिक शुभेच्छा." CUET PG निकाल 2022 परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी घोषित केला जाईल. ते उद्या दुपारी चार वाजेपर्यंत निकाल डाउनलोड करू शकतील. CUET PG परीक्षा 1 सप्टेंबर 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.

Career Tips: ना नोकरी जाण्याची भीती, ना मंदीचं संकट; 'या' क्षेत्रात जॉब मिळाला तर लाईफ सेट

CUET PG Result 2022, कॉमन यूनिवर्सिटी एंट्रेंस टेस्ट पोस्ट ग्रेजुएट रिजल्ट, कॉमन यूनिवर्सिटी एंट्रेंस टेस्ट PG result, CUET PG Result 2022, कॉमन यूनिवर्सिटी एंट्रेंस टेस्ट पोस्ट ग्रेजुएट रिजल्ट, career news, career news in marathi, india news career, करिअर, करिअर मार्गदर्शन, करिअर विषयी माहिती मराठी, करिअर संधी, न्यूज18लोकमत, मराठी बातम्या,

जे CUET PG परीक्षा 2022 उत्तीर्ण होतात ते विद्यापीठांमध्ये PG प्रवेशासाठी पात्र असतील. निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच प्रवेशासंदर्भातील तपशील सूचित केले जातील. CUET PG फायनल आन्सर की 24 सप्टेंबर 2022 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झाली. CUET PG परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी अंतिम की PDF स्वरूपात जारी करण्यात आली आहे.

यावर्षी CUET-PG साठी सुमारे 3.57 लाख लोकांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी मोठ्या प्रमाणात महिला आहेत (1.87 लाख). एकूण, अर्जदारांपैकी सुमारे 33 टक्के अर्जदार अनारक्षित वर्गात मोडतात, 37.53 टक्के ओबीसी सदस्य आहेत, 11.24 टक्के अनुसूचित जाती, 9.2 टक्के अनुसूचित जमाती आणि 8.33 टक्के अर्जदारांनी EWS उमेदवार म्हणून नोंदणी केली आहे. सामाजिक वर्गीकरण. अधिकृत आकडेवारीनुसार, 2273 उमेदवार अपंग व्यक्ती म्हणून पात्र आहेत.

1-2 नव्हे तब्बल 5000 Vacancy; SBI Clerk 2022 परीक्षेचा फॉर्म भरलात की नाही? उद्याची शेवटची तारीख

असा चेक करा तुमचा Result

अधिकृत वेबसाइट- cuet.nta.nic.in वर जा

‘CUET PG 2022 निकाल’ लिंकवर क्लिक करा

आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा

CUET PG चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल

स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Exam result