मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CSIR UGC NET: परीक्षेसाठी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नाहीत? टेन्शन घेऊ नका; अशी लगेच करा नोंदणी

CSIR UGC NET: परीक्षेसाठी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नाहीत? टेन्शन घेऊ नका; अशी लगेच करा नोंदणी

UGC NET Exam

UGC NET Exam

साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट होती, ती आता 17 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जातील दुरुस्ती 19 ते 23 ऑगस्टपर्यंत करता येईल.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 15 ऑगस्ट: CSIR UGC NET जून 2022 Bac साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. CSIR UGC NET परीक्षा विद्यापीठांमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी भरतीच्या पात्रतेसाठी घेतली जाते. तुम्ही csirnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन CSIR UGC NET परीक्षेसाठी अर्ज करू शकता. CSIR-UGC NET साठी अर्जाची प्रक्रिया 11 जुलैपासून सुरू झाली. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट होती, ती आता 17 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जातील दुरुस्ती 19 ते 23 ऑगस्टपर्यंत करता येईल. CSIR UGC NET परीक्षेसाठी पात्रता CSIR UGC NET परीक्षेसाठी, उमेदवार किमान 55% गुणांसह MSc/BS-MS/BS-4 वर्ष/BE/B.Tech/B.Pharma किंवा MBBS उत्तीर्ण असले पाहिजेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सैन्यात नोकरीचा गोल्डन चान्स; AFMS मध्ये तब्बल 420 जागांसाठी भरती UGC NET 2022 साठी असा करा अर्ज UGC NET च्या अधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic.in ला भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवर, “ CSIR UGC NET ऑनलाइन अर्जाची नोंदणी” या लिंकवर क्लिक करा. क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा आणि UGC NET अर्ज भरा. नोंदणी शुल्क भरा आणि सबमिट वर क्लिक करा. UGC NET 2022 फॉर्म सबमिट केला जाईल. UGC NET 2022 डाउनलोड आणि प्रिंट करा UGC NET 2022 नोंदणीसाठी अर्ज शुल्क उमेदवारांनी नोंद घ्यावी की सामान्य/अनारक्षित श्रेणीतील विद्यार्थ्यांना रु. 1100- भरावे लागतील. जनरल-EWS/OBC/NCL साठी रु.550 आणि तृतीय लिंगासाठी रु. 275 भरावे लागतील. गरजू विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! UGC कडून 4 स्कॉलरशिप्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरु; अशी असेल पात्रता UGC NET क्लिअर करणे हे उमेदवारांसाठी एक आव्हानात्मक काम आहे कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी उमेदवारांची चांगली तयारी असणे आवश्यक आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना या काही टिप्स महत्त्वाच्या टिप्स आवश्यक आहे.
First published:

Tags: Career, Career opportunities, Exam, Exam Fever 2022, Jobs Exams

पुढील बातम्या