मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सीआरपीएफमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; नऊ हजारांवर पदांसाठी भरती प्रक्रिया होणार सुरू

सीआरपीएफमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; नऊ हजारांवर पदांसाठी भरती प्रक्रिया होणार सुरू

CRPF Constable Recruitment 2023

CRPF Constable Recruitment 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेडसमन) या पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. या प्रक्रियेतून नऊ हजारांवर जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 16 मार्च :  स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत सरकारी नोकरी करण्याचे बहुतांश तरुण-तरुणींचे स्वप्न असते. पण सर्वांनाच हे ध्येय गाठता येतं असं नाही. सध्याच्या काळात वाढती स्पर्धा आणि कोरोनासह इतर कारणांमुळे उद्योग क्षेत्रावर परिणाम झाल्याने पात्रता असूनही नोकरी मिळणं काहीसं कठीण बनलं आहे. त्यामुळे साहजिकच अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतं. तुम्हीदेखील सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेडसमन) या पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. या प्रक्रियेतून नऊ हजारांवर जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. `जागरण जोश`ने या संदर्भात माहिती दिली आहे.

    आधिकारी व्यवहार मंत्रालय, पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्तीसगड सेक्टर, केंद्रीय राखीव पोलीस दलाने कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेडसमन) या पदासाठी भरती प्रक्रिया घोषित केली आहे. सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2023 साठी इच्छुक आणि पात्रता उमेदवार 27 मार्च 2023 पासून अर्ज करू शकतात. सीआरपीएफ कॉन्स्टेबल रजिस्ट्रेशनसाठी 25 एप्रिल 2023 पर्यंत मुदत आहे. या संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आली असून, त्यानुसार उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत.

    सीआरपीएफ कॉन्स्टेबल 2023 अंतर्गत कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेडसमन) या पदासाठी 9212 जागा भरल्या जाणार आहेत. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा 21,700 ते 69,100 रुपये (लेव्हल 3) यादरम्यान वेतन मिळेल. या प्रक्रियेत 9105 पदं पुरुषांसाठी तर 107 पदं ही महिलांसाठी असतील. याबाबतची माहिती आणि अर्ज करण्याकरिता crpf.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी, असं सूत्रांनी सांगितलं.

    रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची संधी; या पदासाठी लवकरच नोकरभरती, असा करा अर्ज

    सीआरपीएफ कॉन्स्टेबल 2023 या पदासाठी ऑनलाइन परीक्षा, पीएसटी आणि पीईटी, ट्रेड टेस्ट, डीव्ही आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. ऑनलाइन परीक्षेसाठी कम्प्युटर आधारित चाचणीत एक वस्तुनिष्ठ पेपर असेल. त्यात 100 गुणांचे 100 प्रश्न असतील. यात सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क या विषयाचे 25 प्रश्न असतील. त्यासाठी 25 गुण असतील. सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता या विषयावर 25 गुणांचे 25 प्रश्न असतील. प्राथमिक गणित विषयासाठी तसेच इंग्रजी किंवा हिंदी विषयासाठी देखील 25 गुणांचे 25 प्रश्न असतील. या संपूर्ण परीक्षेसाठी उमेदवारास दोन तासांचा अवधी असेल.

    सीआरपीएफ कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेडसमन) या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे विशेष शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. सीटी ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा केंद्र अथवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान मॅट्रिक किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराकडे अवजड वाहनं चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच भरतीवेळी ड्रायव्हिंग चाचणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

    सीटी मॅकेनिक मोटर वाहन या पदासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा समकक्ष संस्थेतून किमान इयत्ता 12वी किंवा इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेला असावा. इच्छुक उमेदवाराने राष्ट्रीय किंवा राज्य व्यावसायिक प्रशिक्षण परिषद किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेद्वारे मान्यताप्राप्त मेकॅनिक मोटार वाहन विषयातील दोन वर्षांचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) प्रमाणपत्र मिळवलेले असावे. संबंधित ट्रेडचा एक वर्षाचा व्यावहारिक अनुभव किंवा मेकॅनिक मोटारमधील राष्ट्रीय किंवा राज्य प्रशिक्षार्थी प्रमाणपत्र असलेल्या तांत्रिक मान्यताप्राप्त संस्थेकडून तीन वर्ष कालावधीचा व्हेईकल ट्रेड आणि संबंधित ट्रेड क्षेत्रातील एक वर्षाचा व्यावहारिक अनुभव असावा.

    10 वी पास तरुणांना मिळेल महावितरणमध्ये नोकरी! 'या' पद्धतीनं करा लगेच अर्ज

    सीटी मेसन/प्लंबर/इलेक्ट्रिशियन (पायोनियर विंग) या पदासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता10 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण झालेला असावा.

    सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2023 साठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. त्यानंतर वैयक्तिक आणि संपर्काबाबत माहिती भरून नोंदणी करावी. संबंधित उमेदवाराला त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड हा नोंदणीकृत ई-मेलवर पाठवला जाईल. त्यानंतर पुन्हा लॉगिन करून श्रेणी निवडावी आणि त्यात वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरावी. ही माहिती फोटो आणि सहीसह सबमिट करावी. त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आणि परीक्षा फी (लागू असल्यास) भरावी. यासाठी उमेदवार ऑनलाईन एसबीआय एमओपीएसद्वारे नेट बँकिंग/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ यूपीआय किंवा चलनाचा पर्याय निवडू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याकरिता पुरुषांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागले. तसेच एससी आणि एसटी तसेच महिलांना कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

    सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 23 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 25 एप्रिल 2023 पर्यंत असेल. अर्जदार उमेदवारांना 20 जून ते 25 जून 2023 दरम्यान अ‍ॅडमिट कार्ड मिळतील. या पदासाठीची परीक्षा 1 जुलै ते 13 जुलै 2023 दरम्यान असेल. इच्छुक उमेदवारांनी या पदभरती संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे, असं सूत्रांनी सांगितलं.

    First published:

    Tags: Career