विज्ञान की अंधश्रद्धा? रद्द झालेल्या गो-विज्ञान परीक्षेवर वैज्ञानिकांची टीका, जाणून घ्या या EXAM बाबत

विज्ञान की अंधश्रद्धा? रद्द झालेल्या गो-विज्ञान परीक्षेवर वैज्ञानिकांची टीका, जाणून घ्या या EXAM बाबत

गोपालन आणि गाईंच्या 51 जातींवरील अभ्यास करण्यासाठी या विशेष परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. दीड तासांची ही परीक्षा 13 भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या (RKA) वतीने घेण्यात येणारी गो विज्ञान (Cow science) ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कालच जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केल्याचं समोर आलं होतं. परंतु या परीक्षेच्या काही तास अगोदर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर विज्ञानाच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याबद्दल अनेक वैज्ञानिकांनी यूजीसीवर (UGC) टीका केली आहे

गो विज्ञान परीक्षा म्हणजे काय?

राष्ट्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने 2012 मध्ये केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाअंतर्गत गोवंश कल्याण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी गो विज्ञान अभ्यासक्रम तयार केला आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरीया यांनी 5 जानेवारीला या परीक्षेची घोषणा केली होती. त्यानंतर 15 जानेवारीपासून यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली होती. गोपालन आणि गाईंच्या 51 जातींवरील अभ्यास करण्यासाठी या विशेष परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. दीड तासांची ही परीक्षा 13 भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार होती. यासाठी कामधेनू आयोगाने अभ्यासक्रमाची देखील घोषणा केली होती. तसंच अनेकांना यासाठी असणाऱ्या पुस्तकांचं देखील वाटप करण्यात आलं होतं. एनडीटीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

विज्ञान की अंधश्रद्धा?

देशी गायींच्या जातींमध्ये लोकांचा रस वाढवण्याच्या प्रयत्नासाठी अनेकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे, तर टीकाकारांनी आरकेए या केंद्र सरकारच्या संस्थेला अवैज्ञानिक तथ्य आणि अंधश्रद्धा पसरवण्यासाठी जबाबदार ठरवलं आहे. यामध्ये अभ्यासक्रमात केलेल्या दाव्यांनुसार भोपाळमधील ज्या नागरिकांनी आपल्या घरावर गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या थापल्या होत्या ते भोपाळ गॅस संकटापासून वाचल्याचं म्हटलं आहे. ज्या ठिकाणी गायींची कत्तल केली जाते त्या भौगोलिक स्थानांवर भूकंप होण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं आहे.

(वाचा - VIDEO : मुंबईतील चाहत्याचा रजनीकांत डोसा सुपरहिट; अशी स्टाईल पाहिली नसेल कधी)

या परीक्षेला विरोध कोण करत आहे?

पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठाने या विषयावरील परीक्षा घेण्यास नकार दिला आहे. देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये जवळपास 5 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी इच्छुक आहेत. परंतु आपल्या फेसबुक पेजवर यासंदर्भात कोकाट्यातील जाधवपूर विद्यापीठाने विरोध दर्शवला आहे. याचबरोबर या अवैज्ञानिक परीक्षेविरोधात अनेक कॉलेज आणि यूजीसीला देखील आपण विनंती करणार असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. केरळशास्त्र साहित्य परिषद यासारख्या इतर संघटनांनी व वैज्ञानिकांनीही ही परीक्षा 'गायीविषयी अंधश्रद्धा पसरवण्याचा' प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर अनेक संस्थांनी देखील ही अवैज्ञानिक परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

(वाचा - लग्नाच्या मंडपातून उठून जोडप्यानं वाचवला चिमुकलीचा जीव, पोलिसांनीही केलं कौतुक)

गो विज्ञानाची परीक्षा कधी घेतली जाणार?

टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, ही परीक्षा 25 फेब्रुवारीला होणार होती. परंतु RKA ने परीक्षा पुढं ढकलली आहे. या परीक्षेवर टीका करण्यात आल्यानंतर ही पुढे ढकलली असल्याचं बोललं जात आहे. पण प्रशासकीय चिंतेमुळे ही परीक्षा स्थगित केली असल्याचं आणि त्यावरील टीकेचा काही संबंध नसल्याचे आरकेएच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला अध्यक्ष वल्लभाई कथिरीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या विषयात आवड असल्याने आगामी आठवड्यात नवीन तारखेची घोषणा केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 23, 2021, 1:46 PM IST

ताज्या बातम्या