मुंबई, 01 डिसेंबर: कोणत्याही कंपनीत जॉब (Latest Jobs) मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा रेझ्युमे (Resume tips) म्हणजेच बायोडेटा तिथल्या वरिष्ठांना द्यावा लागतो. तुमच्या बायोडेटामधील माहितीनुसार तुमच्याबद्दल प्रत्येक माहिती समोरच्यांना समजते. मात्र अनेकदा कंपनीत तुमचा एकच बायोडेटा नसतो. वरिष्ठांना हजारो बायोडेटा (How to make biodata) मिळत असतात. त्यामुळे तुमचा बायोडेटा पूर्णपणे वाचला जाईलच असं नाही. त्यामुळे अनेकांना जॉब (Latest Jobs) मिळू शकत नाही. मात्र तुम्हाला जॉब हवा असेल तर बायोडेटासह Cover Letter देणंही (How to make Cover Letter for jobs) महत्त्वाचं आहे. अगदी फ्रेशर्सपासून (How to make cover letter for freshers) ते प्रोफेशनल्सपर्यंत (How to make cover letter for professionals) सर्वांना Cover लेटर आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला हे Cover Letter नक्की कसं बनवावं हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया Cover Letter बनवण्याच्या टिप्स (Tips for Cover Letter).
कव्हर लेटर म्हणजे नक्की काय? (What is Cover Letter?)
कव्हर लेटर हे स्पष्टीकरण पत्र किंवा संदर्भपत्र आहे. उमेद्वारांबाबत अतिरिक्त माहिती प्रदान करण्यासाठी इतर कागदपत्रांसह पाठवलेले पत्र. रेझ्युमेमध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्य इत्यादींबद्दल माहिती दिली असते. मात्र त्याद्वारे ही नोकरी तुम्हाला का करायची आहे? आणि नियोक्त्याने आमची निवड का करावी? याबद्दल कंपनीतील वरिष्ठांना.माहिती मिळू शकत नाही. मात्र या सर्व गोष्टींची माहिती आपण कव्हर लेटरद्वारे देऊ शकतो. म्हणूनच कव्हर लेटर महत्त्वाचे असते.
विद्यार्थ्यांनो, केवळ शिक्षण घेऊन आणि डिग्री मिळवून अर्थ नाही; Career साठी 'या' गोष्टी ठरतील IMP
नक्की कसं तयार करावं Cover Letter
काही ओळींमध्ये लिहिलेले एक उत्तम कव्हर लेटर आपल्या रोजगाराच्या शक्यता वाढवू शकते. कव्हर लेटर बनवताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या. काही टिप्स जाणून घेऊया
Cover Letter हे 1 पानांपेक्षा जास्त नसावे.
Cover Letter नेहमी तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. दुसर्याकडून लिहून घेऊ नका. मुलाखत देताना हे तुम्हाला खूप मदत करेल.
Cover Letter बनवताना कधीही कॉपी पेस्टची मदत घेऊ नका.
Cover Letter बनवताना नेहमी योग्य फॉरमॅट वापरा.
Cover Letter लिहिताना स्पेलिंग आणि व्याकरणाची विशेष काळजी घ्यावी.
तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहात त्या कामाशी संबंधित अनुभव आणि कामाच्या कौशल्यांबद्दलच लिहा.
कव्हर लेटरमध्ये कमी शब्दात अधिक सांगण्याचा प्रयत्न करा. अतिशयोक्ती शब्द आणि अतिशयोक्ती वाक्ये करू नका.
Cover Letter ची रचना अर्थपूर्ण आणि तुमची प्रोफाइल दर्शवणारी असावी.
तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहात त्यासाठी Cover Letter लिहिण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची यादी बनवून घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.