कंप्यूटरमधून ग्रॅज्युएशन केलेल्यांसाठी या 5 क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी

कंप्यूटरमधून ग्रॅज्युएशन केलेल्यांसाठी या 5 क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी

बी टेक करणाऱ्यांना भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : आजच्या काळात संगणक हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घर, कार्यालय, शैक्षणिक संस्था, अगदी व्यवसायासाठी संगणक खूप महत्वाचा झाला आहे. आयटी-आधारित कंपन्या, फेसबुक, ट्विटर, गुगल, विप्रो, टीसीएस अशी काही नावे आहेत ज्यात बॅचलर इन टेक्नोलॉजी असलेल्या तरुणांना संधी दिली जाते. भारतात 6 हजारहून अधिक इंजिनरिंग कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही डिग्रीचा अभ्याक्रम आहे. या कॉलेजमधून हजारो विद्यार्थी पासआऊट होत असतात नुकतीच बारावीची परीक्षा संपली आहे पुढे काय फिल्ड निवडायचं आणि ग्रॅज्युएट झालेल्यांसाठी आता नोकरीसाठी कोणत्या क्षेत्रात अर्ज करता येऊ शकतात हे जाणून घ्या. बी टेक करणाऱ्यांना भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत जाणून घ्या.

1.अॅप्लिकेशन डेव्हलपर

यामध्ये वेगवेगळे अॅप्लिकेशन डेव्हलप करायचे असतात. लॅपटॉप, मोबाईल टॅबलेटसाठी वेगळे अॅप असतात. त्यानुसार ते डेव्हलप करण आणि त्यावर काम करणं.

हे वाचा-Lockdown मुळे पार्लर बंद? नो टेन्शन, घरबसल्या अशी घ्या केसांची काळजी

2.सॉफ्टवेअर इंजिनियर

अनेक कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी वापरुन, सॉफ्टवेअर इंजिनियर अॅपमधील डेटावर प्रोसेस करतो. आपण मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅब्लेटमध्ये अपलोड केलेली माहिती, जसे की व्हिडिओ, फोटो, कागदपत्रे, संगीत इत्यादी, सॉफ्टवेअर इंजिनियरचे कार्य आहे की ते कसे कार्य करते हे तपासणे आणि त्यावर अपडेट्स व्हर्जनवर काम करणं.

3.सॉफ्टवेअर टेस्टिंग

या फिल्मध्ये प्रोग्राम डेव्हलप करायचे असतात. हे प्रोग्राम तयार करून तपासून पाहायचे. सॉफ्टवेअर टेस्ट करणं. कोणत्याही प्रोग्रॅममध्ये आलेला बग शोधून त्यावर काम करणं.

4.ग्राफिक डिझाइन

ग्राफिक डिझायनिंग हा करियरचा उत्तम पर्याय आहे. लोगो तयार करणं, लेआउट आणि फोटो एडीट करणं यासारखी कार्य करते. विशेषत: ब्रँडच्या गरजेनुसार विचार करणे आणि त्यानुसार डिझाइन बनविणे हे यांचं महत्त्वाचं काम असतं.

5.प्रोफेशनल हॅकिंग

देश आणि जगात दररोज हजारो सॉफ्टवेअर तयार केले जात आहेत. अशा परिस्थितीत या सॉफ्टवेअरच्या सुरक्षेचीही जबाबदारी एखाद्या व्यक्तीने घ्यावी. व्यावसायिक हॅकर्स किंवा नैतिक हॅकर्स खरोखरच अनैतिक हॅकर्सपासून आपला संगणक आणि नेटवर्कचे संरक्षण करतात. ते प्रोग्रामची चाचणी करतात आणि जर सॉफ्टवेअरला कोणताही धोका असेल तर ते त्वरित त्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाय सुचवतात. या हॅकर्सकडे खास लायसन असतं.

हे वाचा-Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 12, 2020, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading