• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Breaking: राज्यात पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

Breaking: राज्यात पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

टास्क फोर्सकडून राज्यातील पहिली ते पाचवी शाळा सुरु करण्याबाबत एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:
मुंबई, 20 नोव्हेंबर: राज्यातील (Maharashtra) शहरी भागात 8 ते 12वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू (School reopen) होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पहिलीपासूनचे (Maharashtra primary school reopen) वर्ग सुरू कऱण्यास शालेय शिक्षण विभागही अनुकूल असल्याची माहिती समोर आली होती. मात्र कोरोना टास्क फोर्सकडून (Corona task force Maharashtra) राज्यातील पहिली ते पाचवी शाळा सुरु (1st to 5th scho0l reopen in Maharashtra) करण्याबाबत एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक (Doctor Sanjay Oak) यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. राज्याचा शालेय शिक्षण विभाग जरी पहिली ते पाचव्या वर्गांपर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत अनुकूल असेल तरी या वर्गांच्या शाळा सुरु करण्याची ही योग्य वेळ नाही. पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु करण्यास टास्क फोर्स अनुकूल नाही. तसंच विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करण योग्य होणार नाही असं मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलं आहे. काय म्हणाले टास्क फोर्सचे प्रमुख "मुलं जवळपास 18 महिने शाळा बाहेर आहेत आणि याच्या दुष्परिणामांची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र लहान मुलं कोविडला बळी पडणार नाहीत याची काळजी टास्क फोर्सला आहे. म्हणूनच पीडियाट्रिक व्हॅक्सिनेशन सुरू व्हावं यासाठी सोमवारच्या मिटिंगमध्ये टास्क फोर्स राज्य सरकारला विनंती करणार आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करणं योग्य ठरणार नाही" असं टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक म्हणाले. Education Loan : शैक्षणिक कर्ज कसं घ्यायचं? कागदपत्र काय लागतात? वाचा सर्वकाही लोकांच्या चुकीमुळे येऊ शकते तिसरी लाट "मास्क ही पहिली लस आहे, पण सणात लोकांनी मास्क टाळला, यामुळेच तिसरी लाट येणारच नाही असं म्हणता येणार नाही. अमेरिकेत मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण इतकं वाढले की मुलांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट केले जात आहे ही परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाहीतिसऱ्या लाटेचा अंदाज चुकल्याचा आनंद मला आहे मात्र तिसरी लाट येणारच नाही असा म्हणता येणार नाही" असंही डॉक्टर ओक म्हणाले. केंद्र सरकारनं लहान मुलांचं लसीकरण सुरु करावं "शाळा लवकरात लवकर सुरु करायच्या असतील तर लहान मुलांचं लसीकरण सुरु होणं गरजेचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं लहान मुलांचं लसीकरण सुरु करावं " असंही डॉक्टरओक म्हणाले.
Published by:Atharva Mahankal
First published: