मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Concentration Tips: अभ्यास करताना तुमचंही मन भरकटतं का? चिंता नको; असं करा कॉन्सन्ट्रेट

Concentration Tips: अभ्यास करताना तुमचंही मन भरकटतं का? चिंता नको; असं करा कॉन्सन्ट्रेट

असं वाढेल Concentration

असं वाढेल Concentration

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा अभ्यासावर फोकस असेल आणि तुम्ही काँसंट्रेट करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 16 सप्टेंबर: परीक्षा म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या मनात सतत अभ्यास अभ्यास असतो. यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा मानसिक ताण  निर्माण होऊ शकतो. मग परीक्षा जसजशी जवळ येऊ लागते तसतसे अभ्यासाचे तास वाढू लागतात. मात्र सतत एकाच ठिकाणी बसून अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर, शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. पण जशी जशी परीक्षा जवळ येते तसं ताण वाढत जातो आणि अभ्यासावर फोकस राहत नाही. जर तुमचाही अभ्यासावर फोकस नसेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा अभ्यासावर फोकस असेल आणि तुम्ही काँसंट्रेट करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया

चांगली जागा निवडणं आवश्यक

नेहमी अभ्यासासाठी शांत वातावरण ठेवा. तसंच बसण्यासाठी चांगली खुर्ची आणि टेबल ठेवा.आपल्याजवळ पुस्तके व्यवस्थित ठेवण्याची सोय असावी. साधारणतः ज्या खोलीमध्ये तुम्ही अभ्यास करणार आहात त्या खोलीबाहेर ‘डू नॉट डिस्टर्ब’ बोर्ड लावा. अभ्यास करताना, कुटुंबातील सदस्यांना पुन्हा पुन्हा आपल्या खोलीत येऊ नये म्हणून सांगा.

लागा तयारीला! UPSC इंजिनिअरिंग सेवा परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; 327 पदांसाठी भरती

अभ्यासाचं नीट प्लॅनिंग करा

अभ्यासासाठी योग्य ते प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. एकाग्रतेने तुम्ही अभ्यासासाठी प्लॅनिंग करू शकता. दररोज अभ्यास करण्यासाठी टाइम टेबल चार्ट बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा. अभ्यासासाठी नेहमी उत्साही रहा आईसाठी तुम्हाला आवडतो त्या विषयाचा पहिले अभ्यास करा. गरजेपेक्षा जास्त वेळ सतत अभ्यास करू नका. वाचायला सोप्या वेळेनुसार तुमचा टाइम चार्ट बनवा.

लक्ष विचलित होऊ देऊ नका

जर तुम्हाला दीर्घकाळ अभ्यास करायचा असेल तर सर्वप्रथम लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. कारण या गोष्टींमुळे तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता आणि अभ्यासात शिकलेले धडे विसरता. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education, Job