मुंबई, 10 जानेवारी: गेल्या काही वर्षांत नोकरदार वर्गाच्या नोकरीच्या अनुषंगाने समस्या वाढल्या आहेत. एकतर नोकरी मिळणं आणि ती टिकणं अवघड झालेलं असताना, जे लोक नोकरी करत आहेत त्यांनादेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमध्ये पगार आणि कामाचा ताण या दोन समस्या प्रमुख आहेत. मनासारखा पगार मिळत नसल्याने नवीन नोकरी शोधण्याकडे किंवा व्यवसायाकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे काही कंपन्या कर्मचाऱ्यांना पगारासह वर्षाला भरघोस बोनस आणि वेगवेगळ्या सुविधा देत आहेत. तैवान येथील एका कंपनीने तर कर्मचाऱ्यांना चार वर्षांच्या पगाराइतका बोनस जाहीर केला आहे. 2022 मध्ये कंपनीला दमदार नफा झाला. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.
महिन्याचा तब्बल 75,000 रुपये पगार थेट तुमच्या अकाउंटमध्ये; मुंबईत बंपर जॉब ओपनिंग्स; करा अप्लाय
तैवान येथील एव्हरग्रीन मरिन कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीने काही निवडक कर्मचाऱ्यांना त्यांचा 50 महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला आहे. 2022 मध्ये कंपनीला व्यवसायात चांगला नफा झाल्याने, स्टेलर बोनस देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या कंपनीशी निगडीत एका व्यक्तीने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. जे कर्मचारी तैवानमधील कार्यालयात कार्यरत आहेत, केवळ त्यांनाच स्टेलर बोनस मिळाला आहे, असं या व्यक्तीनं सांगितलं. कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रेड आणि कामातील परफॉर्मन्सच्या आधारे बोनस देण्यात आला आहे. एव्हरग्रीन मरिन कॉर्पोरेशन कंपनी मूळची तैपेई येथील आहे.
एव्हरग्रीन मरिन कॉर्पोरेशन ही कंपनी 2021 च्या सुरुवातीला विशेष चर्चेत आली होती. कंपनीचं जहाज सुएझ कालव्यात अडकल्याने हे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये खूप गाजलं होतं. सध्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या बोनसमुळे ही कंपनी चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांत या शिपिंग कंपनीचा शेअर मार्केटमधील परफॉर्मन्स संमिश्र राहिला. 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 250 टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र गेल्या वर्षी या कंपनीचा शेअर 54 टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं.
सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा
2022 मध्ये व्यवसाय चांगला झाल्याने या कंपनीने कर्मचाऱ्यांना सुमारे चार वर्षांचा (50 महिन्यांचे) पगार बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एव्हरग्रीन मरिन कॉर्पोरेशनने या उपक्रमाबाबत अधिक खुलासा करण्यास नकार दिला आहे. वर्षाच्या अखेरीस मिळणारा बोनस कर्मचाऱ्याला त्याच्या वैयक्तिक कामगिरी आणि कंपनीच्या कामगिरी आधारे दिला जातो, असं कंपनीने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कंपनीने दाखविलेल्या या उदारतेमागं काही कारणं आहेत.
कोरोना महामारीमुळे गेल्या काही वर्षांत शिपिंग उद्योगाची भरभराट झाल्याचं चित्र आहे. यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. ग्राहकांकडून मालाला मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीचा नफाही 2020 च्या तुलनेत 1 लाख 70 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. तैपेईतील एका वृत्तपत्राने गेल्या आठवड्यात याबाबत एक वृत्त प्रकाशित केलं होतं.
30 डिसेंबरला कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांना लाखो रुपये बोनस स्वरूपात मिळाले आहेत. पण कंपनीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला इतका बोनस मिळालेला नाही. कंपनीच्या शांघाय येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हा भेदभाव असल्याचं म्हटलं आहे. आम्हाला मासिक वेतनाच्या केवळ पाच ते आठ टक्केच बोनस मिळाल्याचं शांघायमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, World news