मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील भरपूर नोकऱ्या; 59 टक्के कंपन्या भरतीसाठी तयार! वाचा कुठे मिळतील संधी

डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील भरपूर नोकऱ्या; 59 टक्के कंपन्या भरतीसाठी तयार! वाचा कुठे मिळतील संधी

भारतातील कंपन्या जुलै-डिसेंबर या सहामाहीत जानेवारी-जून पेक्षा 12 टक्के अधिक भरती (Hiring in Second half of 2022) करणार आहेत.

भारतातील कंपन्या जुलै-डिसेंबर या सहामाहीत जानेवारी-जून पेक्षा 12 टक्के अधिक भरती (Hiring in Second half of 2022) करणार आहेत.

भारतातील कंपन्या जुलै-डिसेंबर या सहामाहीत जानेवारी-जून पेक्षा 12 टक्के अधिक भरती (Hiring in Second half of 2022) करणार आहेत.

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : या वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीमध्ये भरपूर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. करिअर आऊटलुकच्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार; भारतातील कंपन्या जुलै-डिसेंबर या सहामाहीत जानेवारी-जून पेक्षा 12 टक्के अधिक भरती (Hiring in Second half of 2022) करणार आहेत. एकूण 14 शहरांमधील 18 विविध क्षेत्रांतील 865 कंपन्यांचा सर्व्हे करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. डिसेंबरपर्यंत 59 टक्के कंपन्या नवीन भरती (Hiring in India) करण्याच्या विचारात आहेत, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

टीमलीज एडटेकचे फाउंडर आणि सीईओ शांतनू रोझ यांनी सांगितले, की देशात एंट्री लेव्हल जॉब्ज आणि फ्रेशर्सची (Job opportunities for freshers) भरती करण्याचा विचार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. बहुतांश कंपन्या आपल्याकडे फ्रेशर्सची संख्या अधिक असावी यासाठी प्रयत्नशील आहेत. आकडेवारी पहायची झाल्यास, 42 टक्के कंपन्यांनी फ्रेशर्सना भरती करण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ही संख्या येत्या काही वर्षांमध्ये आणखी वाढणार आहे.

'या' क्षेत्रांमध्ये होणार सर्वाधिक भरती

पहिल्या सहामाहीप्रमाणे दुसऱ्यातही भरती करण्यात आयटी क्षेत्रातील (IT Sector jobs) कंपन्या आघाडीवर असतील. जुलै ते डिसेंबर या कालावधीत 65 टक्के आयटी कंपन्या भरतीच्या तयारीत आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ई-कॉमर्स क्षेत्रातील (E-com Sector Jobs) कंपन्यांचा नंबर लागतो. 48 टक्के ई-कॉम कंपन्या या सहामाहीत भरती जाहीर करतील. तिसऱ्या क्रमांकावर टेक्नॉलॉजी स्टार्टअप क्षेत्र आहे, ज्यातील 47 टक्के कंपन्या भरतीच्या तयारीत आहेत. तर, टेलिकॉम क्षेत्रातही (Telecom Sector Job) या कालावधीमध्ये बंपर भरती निघणार आहे.

('ही' सोन्या-चांदीने मढलेली शववाहिका पाहिलीत का?)

आयटी कंपन्या देणार एक लाख नोकऱ्या

या रिपोर्टमधील आकडेवारीनुसार, आयटी कंपन्यांमध्ये डिसेंबरपर्यंत तब्बल एक लाख फ्रेशर्सची (IT Jobs for freshers) भरती होईल. कंपन्या आपला खर्च 101.8 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहेत. या कालावधीमध्ये निर्यातीत 8-10 टक्के वाढ होऊ शकते. सॉफ्टवेअर प्रॉडक्ट इंडस्ट्री आणि केंद्र सरकारतर्फे या वेळी 111.58 अब्ज डॉलर्सची अर्थसंकल्पीय तरतूद केली जात आहे. टेलिकॉम कंपन्याही आपल्या विस्तारासाठी तब्बल 3,345 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

'या' शहरांमध्ये सर्वाधिक संधी

एकूण 14 शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार, कोणत्या शहरात (Which city to offer more jobs) नोकरीच्या सर्वाधिक संधी उपलब्ध होतील याबाबत देखील यात माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, बेंगळुरूमध्ये या सहामाहीत 68 टक्के नोकऱ्या उपलब्ध होतील. या ठिकाणी फ्रेशर्सना अधिक संधी मिळेल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबईत 50 टक्के नोकऱ्या उपलब्ध होतील, तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीमध्ये 45 टक्के भरती होईल. जानेवारी-जून या सहामाहीमध्ये बेंगळुरूत 59 टक्के, मुंबईत 43 टक्के, तर दिल्लीत 39 टक्के कंपन्यांनी नोकऱ्या उपलब्ध केल्या होत्या. या सहामाहीत ही आकडेवारी वाढलेली दिसून येतंय.

एकूणच येत्या काही महिन्यांमध्ये नोकरीच्या कित्येक संधी उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे युवकांनी आणि विशेषतः फ्रेशर्सनी तयार व्हायला हवं.

First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams