• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • विद्यार्थ्यांनो, कॉलेज लाईफ अनुभवण्यासाठी राहा तयार; राज्यात उद्यापासून सुरू होणार कॉलेजेस; वाचा नियम

विद्यार्थ्यांनो, कॉलेज लाईफ अनुभवण्यासाठी राहा तयार; राज्यात उद्यापासून सुरू होणार कॉलेजेस; वाचा नियम

कॉलेजेस सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार कडून काही नियमावली (Rules to attend College in Maharashtra) तयार करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर: गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा परत सुरु झाल्या आहेत. त्यापाठोपाठ आता राज्यातील कॉलेजेस सुरु करण्याचा (Colleges Reopen in Maharashtra) निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्यापासून म्हणजेच 20 ऑक्टोबरपासून (Colleges opening date in Maharashtra) सुरु होणार आहेत अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा कॉलेज लाईफचा अनुभव घेता येणार आहे. मात्र कॉलेजेस सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार कडून काही नियमावली (Rules to attend College in Maharashtra) तयार करण्यात आली आहे. मुंबईत आणि राज्यातील काही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आलं नाही अशा विद्यार्थ्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळा आणि कॉलेजेस सुरु करणं गरजेचं होतं. तसंच ऑनलाईन शिक्षणादरम्यान वेळोवेळो विद्यार्थ्यांना काही समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. या सर्व समस्या आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून सुरु होणार मुंबईतील महाविद्यालय, विद्यापीठानं जाहीर केली SOP असे असतील नियम कॉलेज सुरु करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. 50% पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू केले जाणार आहेत. लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्याना कॉलजेमध्ये येणं शक्य होत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाची नियमावली पाळून वसतिगृह सुरु करण्यात येतील. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं संपूर्ण लसीकरण होणं महत्त्वाचं आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांनी कोरोनचे सर्व नियम पाळूनच महाविद्यालयं सुरु करायची आहेत.
  Published by:Atharva Mahankal
  First published: