Home /News /career /

ठरलं! विद्यार्थ्यांनो, 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेजेस होणार सुरु; जाणून घ्या काय असेल नियमावली

ठरलं! विद्यार्थ्यांनो, 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेजेस होणार सुरु; जाणून घ्या काय असेल नियमावली

कॉलेज सुरु करण्याबाबत (Colleges reopening in Maharashtra) एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कॉलेज आणि शाळा (Colleges and schools closed) संपूर्णपणे बंद होते. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण (Corona) होऊ नये यासाठी शाळा आणि कॉलेजेस बंद होते. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन  (Online education) सुरु आहे. मात्र आता राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी कॉलेज सुरु करण्याबाबत (Colleges reopening in Maharashtra) एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शाळांनंतर आता येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालयं  (Colleges Reopening in Maharashtra) सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषद  घेत दिली आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी काही नियमावली (Rules and regulations about Colleges Reopening in Maharashtra) तयार करण्यात आली आहे. कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील नियमावली कॉलेज सुरु करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. 50% पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू केले जाणार आहेत. लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्याना कॉलजेमध्ये येणं शक्य होत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाची नियमावली पाळून वसतिगृह सुरु करण्यात येतील. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं संपूर्ण लसीकरण होणं महत्त्वाचं आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांनी कोरोनचे सर्व नियम पाळूनच महाविद्यालयं सुरु करायची आहेत. लोकल सुरु होणार का? मुंबईतील कॉलेजेस सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी लोकलची (Local train for college students in Mumbai) गरज असणार आहे. अशा परिस्थिती कॉलेज सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी लोकलची सेवा सुरु करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवदेन सादर केलं जाणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या