• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Maharashtra School Reopen: 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार, शाळांची घंटा पुन्हा वाजणार

Maharashtra School Reopen: 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार, शाळांची घंटा पुन्हा वाजणार

Maharashtra School Reopen: अखेर राज्यातील शाळा सुरू होणार, 'या' तारखेपासून वाजणार शाळांची घंटा

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, राज्यातील शाळा अखेर सुरू (Maharashtra School reopen) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार (Maharashtra school reopen from 4 October) आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला  होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मान्यता मिळाली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नसणार यापूर्वीही राज्यातील शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील जवळपास सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत सुरू आहेत. केवळ शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यावर आता मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. काल उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं? राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्यात यावी असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयं येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय सांगितला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जिल्ह्यांची कोरोनाची कोरोनाची स्थिती बघूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे विधान केलं होतं. येत्या 2 ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालयं टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं घेण्यात येऊ शकतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं.
  Published by:Sunil Desale
  First published: