मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Class XII Exam Cancelled: 12वी परीक्षा रद्द झाल्यावर पुढे काय? जाणून घ्या 5 प्रश्नांची उत्तरं

Class XII Exam Cancelled: 12वी परीक्षा रद्द झाल्यावर पुढे काय? जाणून घ्या 5 प्रश्नांची उत्तरं

CBSE Class xii exam cancelled: 12वी परीक्षा तर होणार नाही, पण मार्कांचं काय, पुढच्या अॅडमिशनचं काय? सरकार कुठल्या फॉर्म्युलाचा विचार करतंय, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं...

CBSE Class xii exam cancelled: 12वी परीक्षा तर होणार नाही, पण मार्कांचं काय, पुढच्या अॅडमिशनचं काय? सरकार कुठल्या फॉर्म्युलाचा विचार करतंय, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं...

CBSE Class xii exam cancelled: 12वी परीक्षा तर होणार नाही, पण मार्कांचं काय, पुढच्या अॅडमिशनचं काय? सरकार कुठल्या फॉर्म्युलाचा विचार करतंय, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं...

नवी दिल्ली, 2 जून: सीबीएसईच्या (CBSE) 12वी च्या परीक्षा केंद्र सरकारने रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी (students) आणि त्यांच्या पालकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे ते रिझल्टची (result) प्रक्रिया आणि मार्किंग फॉर्म्युला काय असणार याकडे डोळे लावून बसले आहेत. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा होतील याबाबत चिंतेत असलेले विद्यार्थी आणि पालक आता रिझल्ट, क्रायटेरिया (गुण देण्याचे निकष) आणि पुढच्या शिक्षणासाठी अॅडमिशन घेण्यासाठी युनिव्हर्सिटी (university) आणि कॉलेजेस (collages) शोधत आहेत. मात्र, परीक्षेसंदर्भात त्यांनाही काही प्रश्न पडत आहेत. 12वीच्या परीक्षेसंदर्भातील अशाच काही प्रश्नांची उत्तर आम्ही तुमच्यासाठी आणली आहेत. पाहुयात.. परीक्षेशिवाय कसे पास होणार विद्यार्थी सीबीएसईच्या 12वीं च्या परीक्षा रद्द केल्यानंतर सरकारने म्हटलंय की रिझल्टची प्रक्रिया ही पारदर्शक आणि निष्पक्ष असेल. याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच बोर्डाकडून दिली जाईल. याबाबतीत सीबीएसईकडून एक पत्रक काढण्यात आलंय. त्यात म्हटलंय की, लवकरच विद्यार्थ्यांना पास करण्याबाबतचा फॉर्म्युला सादर केला जाईल. सध्या तरी 10वी प्रमाणेच 12वी च्या विद्यार्थ्यांना देखील इंटर्नल असेसमेंटच्या आधारे पास केलं जाईल, अशी शक्यता आहे. 'रोजंदारीवर काम करायला तयार आहे,'; पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्याचं Tweet चर्चेत याशिवाय नववी, 10वीतील परफॉर्मन्स गृहीत धरला जाऊ शकतो. यामध्ये इंटर्नल असेसमेंटचे 20 गुण, वर्षभरातील टेस्ट किंवा दुसऱ्या पेपरचे गुण एकत्र करून 80 पैकी गुण दिले जातील. परीक्षा रद्द झाल्यानंतरही विद्यार्थ्याला पेपर द्यायचा असेल तर? सीबीएसईने 12वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पास करण्यासह पेपर देऊन पास होण्याचा पर्यायदेखील दिलाय. ज्या विद्यार्थ्यांना असेसमेंट नकोय ते परीक्षा देऊ शकतील. त्यांच्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षा देण्यासाठी व्यवस्था केली जाईल. याबाबत बोर्डाकडून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल. ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन कसं होणार? सीबीएसईचा 12वी चा रिझल्ट जुलै अखेरपर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी अशा शैक्षणिक संस्थांमध्ये अर्ज करू शकतात, जिथे रिझल्ट उशीरा मागितला जातो. बॅकबेंचर बनला IAS ऑफिसर; कुमार अनुराग यांच्या स्वप्नांचा प्रवास विद्यार्थ्यांना रिझल्ट घोषित झाल्यानंतर फक्त मार्कशीट जमा करावी लागेल. अनेक विद्यापीठांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत अॅडमिशन ओपन असतात. अशात ग्रॅजूएशनच्या अडमिशनमध्ये अॅडचणी येणार नाहीत. परदेशात शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यांचं काय होणार? 12वी चे विद्यार्थी आधीप्रमाणेच आताही परदेशात शिक्षणासाठी अप्लाय करू शकतात. परदेशातील अनेक मोठे विद्यापीठ ऑनलाइन एंट्रन्स टेस्ट घेतात. एंट्रन्स एक्झाम (Entrance exam )पास झाल्यानंतर 12वीचा रिझल्ट मागवला जाईल. परदेशातील शैक्षणिक वर्ष जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होतं. त्यामुळे तिथे फायनल मार्कशीट केव्हा सबमिट करावी लागते, त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती काढावी लागेल. कोणकोणत्या बोर्डांनी रद्द केल्या 12वी च्या परीक्षा सीबीएसई आणि सीआय़एससीई शिवाय हरियाणा बोर्डानेही 12वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र,  उत्तर प्रदेश बोर्ड, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड राज्यांकडून परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबत ही राज्ये लवकरच निर्णय घेतील.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Board Exam, CBSE, HSC

पुढील बातम्या