मुंबई, 18 नोव्हेंबर : चालू शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाने यासंदर्भात निवेदन जाहीर केलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या परीक्षा होतील. SSC म्हणजे दहावीची परीक्षा मंगळवार 3 मार्च 2020 ते सोमवार 23 मार्च 2020 दरम्यान होणार आहे. उच्चमाध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी HSC ची परीक्षा मंगळवार 18 फेब्रुवारी 2020 ते बुधवार 18 मार्च 2020 दरम्यान होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या मंडळाच्या वेबसाईटवर वेळापत्रकाची माहिती देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक याच वेबसाइटवर उपलब्ध होईल.
प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल्स, तोंडी परीक्षा यांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा आणि महाविद्यालयांना पाठवण्यात येईल, असंही मंडळाने कळवलं आहे. या वेळी दहावीची परीक्षा पुनर्ररचित अभ्यासक्रमानुसार होणार आहे. विषयानुसार कुठल्या दिवशी कुठला पेपर याचं सविस्तर टाईमटेबल अजून जाहीर झालेलं नाही. लवकरच हे वेळापत्रक जाहीर होईल.
वाचा - सोशल मीडियावरची पोस्ट पडली महागात, एका फोटोनं संपवलं क्रिकेटपटूचं करिअर
शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरच या तारखा आणि वेळापत्रकही अपलोड करण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात वेळापत्रक देण्यात येईल. तेच वेळापत्रक अंतिम असेल आणि तेच ग्राह्य धरावं, असंही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळवलं आहे. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरणारं वेळापत्रक खोटं असू शकतं. ते ग्राह्य धरू नये, असं आवाहनही मंडळाने केलं आहे.
--------------------------
अन्य बातम्या
सत्तेची स्वप्न बघणाऱ्या शिवसेनेला धक्का, बैठकीआधी सोनिया गांधी यांना पत्र
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचा उमेदवार ठरला, 'या' नावावर झालं शिक्कामोर्तब
बाबा रामदेव आंबेडकरांना म्हणाले 'वैचारिक दहशवादी', सोशल मीडियावर रोष
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा