Home /News /career /

Civil Services Exam Tips: परीक्षेत उत्तर लिहिण्याच्या आधी कशा पद्धतीनं समजून घ्याल प्रश्न? वाचा महत्त्वाच्या टिप्स

Civil Services Exam Tips: परीक्षेत उत्तर लिहिण्याच्या आधी कशा पद्धतीनं समजून घ्याल प्रश्न? वाचा महत्त्वाच्या टिप्स

परीक्षेत उत्तर लिहिण्याच्या आधी कशा पद्धतीनं समजून घ्याल प्रश्न? वाचा

परीक्षेत उत्तर लिहिण्याच्या आधी कशा पद्धतीनं समजून घ्याल प्रश्न? वाचा

तुम्ही मानसिक संकटात पडता आणि जे विचारलं आहे ते न लिहिता भलतंच उत्तर लिहिता. मात्र ही सवय टाळता येऊ शकते. यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: दरवर्षी भारतातील लाखो विद्यार्थी निरनिरळ्या शासकीय परीक्षांसाठी (Government Job Exams Tips) अर्ज करतात. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी हे सिव्हिल सर्व्हिसेस (Civil Services exams) आणि UPSC (UPSC exam Preparation Tips) ची परीक्षा देतात. या परीक्षांमध्ये लेखी पेपर (How to write written paper in UPSC) असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे फार विचार करून लिहणं गरजेचं असतं. त्यात जर प्रश्नच समजला (How to Understand questions in Civil Services Exam quickly) नाही तर? असं झाल्यास तुम्ही उत्तर लिहू शकणार नाही. म्हणूनच कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना तो प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आज परीक्षेच्या तणावातून मुक्त होऊन प्रश्नांवर लक्ष देऊन उत्तर कशी लिहायची (How to write Answers in Civil Services Exam) याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. यासाठी सुरुवातीला प्रश्न पूर्णपणे समजून घ्या. परीक्षार्थी प्रश्न न समजताच उत्तर लिहू लागतात. वास्तविक ते विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहित नाहीत तर त्या प्रश्नाशी संबंधित प्रकरणावर उत्तर लिहायला सुरुवात करतात. इथेच सगळं गडबडून जातं. वास्तविक प्रत्येक प्रश्न कोणत्या ना कोणत्या धड्याशीसंबंधित असतो, त्यामुळे तो प्रश्न कोणत्या धड्यातील आहे हे पाहावं लागेल. इथे तुम्ही मानसिक संकटात पडता आणि जे विचारलं आहे ते न लिहिता भलतंच उत्तर लिहिता. मात्र ही सवय टाळता येऊ शकते. यासाठी काही टिप्स जाणून घेऊया. उमेदवारांनो, नवी नोकरी जॉईन करताना 'या' 4 गोष्टींचा नक्की करा विचार प्रश्नाच्या छटा समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न समजून घेतल्यानंतर त्याच्या छटा पकडण्याचा प्रयत्न करा. लाल रंग सारखाच आहे का? उगवत्या सूर्याचा लाल रंग, रक्ताचा लाल रंग आणि गुलाबाचा लाल रंग सारखाच असतो का? नाही, त्या सर्वांचा रंग लाल आहे, परंतु लाल रंगाच्या छटा सारख्या नसतात. जर तुम्ही त्यांना काळजीपूर्वक पहाल तर तुम्हाला त्यांच्यात थोडा फरक दिसेल. तुमचे प्रश्न देखील तुमच्याकडून असेच विशिष्ट लक्ष देण्याची मागणी करतात. परीक्षक नेमके कोणतं उत्तर अपेक्षित करत आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रश्नाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करा. हे उदाहरण येईल कमी लक्षात ठेवा तुमचं उत्तर चुकीचं नाही याचा अर्थ तुमचं उत्तर बरोबर आहे असंही नाही. तुम्ही तिरंदाजी स्पर्धा पाहिली आहे का? नसेल तर बघा. त्यात जर तुमचं लक्ष्य सर्वात आतल्या लहान वर्तुळावर आदळलं तर तुम्हाला चार अंक मिळतील. त्यानंतरच्या फेऱ्यांवर अनुक्रमे तीन, दोन आणि एक अंक मिळेल. जर लक्ष्य फळीच्या बाहेर गेलं तर शून्य. त्यामुळे हे लक्षात ठेवा की एका नंबरचं टार्गेट चुकीचं नव्हतं, पण ते पूर्णपणे बरोबरही नव्हतं. कारण कोणाला ना कोणाला चार आकडाही मिळेल आणि शून्यही. मात्र जर तुम्हाला प्रश्न समजला तरच तुम्हाला चार आकडा मिळेल. Best Books: स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग 'ही' पुस्तकं नक्की येतील कामी प्रश्नातील 'कीवर्ड' शोधा बरेच विद्यार्थी प्रश्नात दिलेल्या 'कीवर्ड'कडे (Keywords in Questions) पूर्णपणे दुर्लक्ष करतात. मात्र असं करू नका. विद्यार्थ्यांना 'चर्चा करणे', 'विश्लेषण करणे', 'चर्चा करणे', 'टीका करणे', 'टिप्पणी लिहिणे' इत्यादी शब्दांचा अर्थ सारखाच वाटतो. ते सारखे नसताना. हे मूलभूत शब्द आहेत जे तुम्हाला तुमचं उत्तर कसे लिहायचं हे ठरवतात. म्हणूनच त्यांच्याकडे करू नका. प्रश्नाचा आशय नीट समजूनच उत्तरं लिहा. यश तुम्हालाच मिळेल.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Tips, Upsc exam

    पुढील बातम्या