Home /News /career /

पुण्याचा JEE टॉपर IIT ऐवजी MIT ला जाणार; चिरागच्या निर्णयावर नेटकऱ्यांची तुफान 'ट्रोलेबाजी'

पुण्याचा JEE टॉपर IIT ऐवजी MIT ला जाणार; चिरागच्या निर्णयावर नेटकऱ्यांची तुफान 'ट्रोलेबाजी'

JEE-Advanced प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील चिराग फालोर परीक्षेत प्रथम आला आहे.

    मुंबई, 6 ऑक्टोबर : JEE-Advanced प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील चिराग फालोर परीक्षेत प्रथम आला आहे. IIT मुंबई झोनमधून चिराग फालोर याने सामान्य श्रेणी यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. 1 लाख 60 हजार परीक्षार्थींमधून त्याने पहिला क्रमांक पटकावला असून या परीक्षेत केवळ 43 हजार परीक्षार्थी पास झाले आहेत. त्यानंतर आता त्याने भारतात शिक्षण न घेता अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आहे. त्याने अमेरिकेतील Massachusetts Institute of Technology (MIT) मध्ये प्रवेश घेण्याचं नक्की केलं आहे. याआधी झालेल्या JEE मुख्य परीक्षेत त्याने भारतातून 12 वा क्रमांक पटकावला होता. चिराग फालोर हा अमेरिकेतील अतिशय नावाजलेली शिक्षण संस्था असलेल्या MIT मध्ये प्रवेश घेणार आहे. त्याने या संस्थेमध्ये प्रवेशदेखील मिळवला आहे. पण कोरोनामुळे त्याला अमेरिकेत जाता आलेलं नाही. त्याला JEE Advanced परीक्षा खूप अवघड असते असं वाटल्यानं त्याने यासाठी प्रयत्न केले. पण पहिल्याच प्रयत्नात आपण ही परीक्षा पास झाल्याचा त्याला आनंद आहे. याविषयी बोलताना चिराग म्हणाला, 'मी यासाठी मागील चार वर्षांपासून अभ्यास करत होतो. त्यामुळे मी ही संधी वाया घालवणार नव्हतो. पण मी आता MIT मध्ये शिकण्याचा निर्णय घेतला आहे.' 'MIT मध्ये तुमच्या बौद्धिक कौशल्यापेक्षा व्यक्तिमत्त्व आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जातो. मिळालेल्या संधीचं रूपांतर तुम्ही कशात करता हे त्या ठिकाणी पाहिलं जात असल्यामुळं मी MIT मध्ये शिकण्याचा निर्णय घेतलच्या'नं त्याने सांगितलं. ANIशी बोलताना त्यानं सांगितलं की, 'MIT मध्ये कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षा नसते. त्याचबरोबर IITच्या तुलनेत MIT मधील गणित आणि फिजिक्स सोप्या पद्धतीनी शिकवलं जातं. त्या ठिकाणी मला अस्ट्रोफिजिक्सचं शिक्षण घ्यायचं असल्याचं' तो म्हणाला. त्याच्या या निर्णयानंतर भारतीय पालकांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्विटरवर सल्ले दिले आहेत. ट्विटरवर या सल्ल्यांचा पूर आला आहे. यामध्ये एकाने म्हटलं आहे, 'एकप्रकारे त्याने MITची निवड करत आपली JEE बद्दलची नाराजी दर्शवली आहे.' तर 'कुणीही MIT आणि JEE मध्ये MIT चीच निवड करेल,' असं एकाने म्हटलं आहे. याआधी त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाल शक्ती पुरस्कार देखील मिळाला आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या