Home /News /career /

CBSE Exams 2022: उद्यापासून सुरु होणार परीक्षा; परीक्षा केंद्रावर जाण्याआधी 'या' गोष्टी आधी तपासून घ्या

CBSE Exams 2022: उद्यापासून सुरु होणार परीक्षा; परीक्षा केंद्रावर जाण्याआधी 'या' गोष्टी आधी तपासून घ्या

सेंटरला जाताना खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

सेंटरला जाताना खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips for board exams) आणि सूचना देणार आहोत ज्यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात सेंटरला जाताना आणि गेल्यानंतर खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

    मुंबई, 24 एप्रिल: या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 10th 12th Exams 2022) दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी टर्म 1 (CBSE Term 1 Exam) ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकालही लावण्यात आला होता. आता CBSE बोर्डाच्या परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजे CBSE Term 2 Exam परीक्षा ही उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जोमानं अभ्यासाला लागले आहेत. काही विद्यार्थी परीक्षेच्या भीतीमुळे महत्वाच्या वस्तू घरी विसरतात. तर सेंटरला गेल्यानंतरही काही सूचनांचं पालन करत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनो घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips for board exams) आणि सूचना देणार आहोत ज्यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात सेंटरला जाताना आणि गेल्यानंतर खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. वेळेचं पालन करा परीक्षेच्या किमान २ तास आधी अभ्यास बाजूला ठेऊन २ मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसा. स्वतःच्या मेंदूला आणि मनाला शांत करा. त्यानंतर आपली सर्व कामं करून वेळेत परीक्षेला जा. किमान १ तास आधी परीक्षेच्या सेंटरवर पोहोचा. यामुळे तुम्हाला तुमचा वर्ग आणि जागा शोधण्यास वेळ मिळू शकेल. CBSE चा मोठा निर्णय! टर्म 1 ची परीक्षा दिली नसेल तरी नो टेन्शन; बोर्डातर्फे जाहीर होणार निकाल हॉल तिकीट तपासून घ्या परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट सोबत घ्यायला विसरू नका. तसंच सोबत २-३ पेन . पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, स्केल आणि इतर महत्वाच्या सर्व गोष्टी आठवणीनं घ्या. यासाठी वस्तूंची यादी बनवून घ्या आणि ती भिंतीवर लावून ठेवा. यामुळे तुम्हाला सगळं घेतलं की नाही हे लक्षात राहील. हॉल तिकीट सांभाळून ठेवा अशा वेळी घाबरू नका. लगेच तुमच्या सेंटरवरील अधिकारांना याबाबत माहिती द्या. तसंच त्यांना हॉल तिकिटशिवाय परीक्षा देऊ देण्याची परवानगी मागा. मात्र असं काहीच होऊ नये म्हणून तुमच्या हॉल तिकीटाची एक झेरॉक्स नेहमी आपल्या बॅगमध्ये ठेवा. जर तुमचं हॉल तिकीट हरवलं तर अधिकाऱ्यांना ही झेरोझ दाखवून मग परीक्षा देण्याची परवानगी मागा. हे सर्व करताना आपला आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. कॉपीपासून राहा सावधान परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थी कागदांचे तुकडे खिशात लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा हे विद्यार्थी उत्तर लिहून झाल्यावर कागद वर्गात फेकून देतात. असा कुठला कागद तुमच्या जागेजवळ असला तर त्याला हात लावण्याआधी वर्गातील शिक्षकांना सांगा. असं केल्यामुळे कुठलाही चुकीचा आरोप तुमच्यावर होणार नाही. तुम्ही शांतपणे आपला पेपर देऊ शकाल. होम सेंटर्सवर होणार नाही CBSE परीक्षा; बोर्डानं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स पाण्याची बाटली जवळ बाळगा उन्हळ्याच्या दिवसांत परीक्षा असल्यामुळे तुम्हाला तहान लागू शकते. त्याचप्रमाणे अनेकदा भरपूर लांबून सेंटरला पोहोचल्यानंतर तुम्हाला तहान लागू शकते. अशावेळी तुमच्याजवळ स्वतःची पाण्याची बाटली नसल्यास तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसंच परीक्षेत तुमचं लक्ष लागू शकत नाही. म्हणूनच परीक्षेला जाताना नेहमी आपल्याजवळ पाण्याची बाटली जरूर ठेवा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career, Career opportunities, CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022

    पुढील बातम्या