Home /News /career /

CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या Paper Pattern मध्ये बोर्डानं केले 'हे' मोठे बदल; जाणून घ्या पॅटर्न

CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या Paper Pattern मध्ये बोर्डानं केले 'हे' मोठे बदल; जाणून घ्या पॅटर्न

 पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल

पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल

आता CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल (Changes in CBSE Exam paper pattern) केले आहेत. काय आहेत हे बदल जाणून घ्या.

    मुंबई, 23 मे: कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 10th 12th Exams 2022) दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यंदा दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा (CBSE exam pattern next year) होणार की पुन्हा एकच परीक्षा (How CBSE Exam will held next year) होणार याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते. मात्र आता CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल (Changes in CBSE Exam paper pattern) केले आहेत. काय आहेत हे बदल जाणून घ्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने 10वी, 12वी परीक्षेच्या पॅटर्नबाबत मोठा बदल केला आहे. सीबीएसई 10वी, 12वी बोर्ड परीक्षांबाबत जुन्या पॅटर्नवर परतली आहे. त्यानुसार आता 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या जात आहेत. वर्षातून एकदा परीक्षा घेण्याची तरतूद करण्यासाठी CBSE ने यात बदल केला आहे. MH Board 10th Result: विद्यार्थ्यांनो 'या' वेबसाईट्सवर बघता येईल 10वीचा निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस दहावीच्या परीक्षेत हे बदल याअंतर्गत CBSE कडून इतरही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आता दहावीतील (CBSE new Exam pattern for 10th class students) 40 टक्के प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थींना त्यांच्या आकलनाच्या आधारे द्यावी लागणार आहेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना रटाळ ऐवजी समजुन उत्तर देता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. याशिवाय 20 टक्के प्रश्न MCQ आणि 40 टक्के प्रश्न लहान उत्तरांचे असतील. बारावीच्या परीक्षेतील बदल यासोबतच बारावीच्या परीक्षेतही (CBSE new Exam pattern for 12th class students) बोर्डाकडून काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता परीक्षेतील 50% प्रश्न हे लहान आणि दीर्घ उत्तराचे असतील. त्याच वेळी, 30 टक्के प्रश्न केस स्टडीचे असतील आणि 20 टक्के प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मंडळाने हे बदल केले आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आता रटाळ न करता समजुतीवर सोडले पाहिजे, असे मंडळाचे मत आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11वीला प्रवेश घेण्यासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार Online Registration; जाणून घ्या प्रोसेस मात्र, यासोबतच अंतर्गत परीक्षा पद्धतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. म्हणजेच शाळा ज्या पद्धतीने अंतर्गत परीक्षा घ्यायच्या त्याच पद्धतीने ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासोबतच बोर्डाने प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल केला आहे. ज्याची माहिती शाळांना देण्यात आली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career, Career opportunities, CBSE 10th, CBSE 12th, Education, Exam Fever 2022

    पुढील बातम्या