Home /News /career /

Central Railway Recruitment 2021: सेंट्रल रेल्वेत केवळ मुलाखतीद्वारे होणार भरती, असा करा अर्ज

Central Railway Recruitment 2021: सेंट्रल रेल्वेत केवळ मुलाखतीद्वारे होणार भरती, असा करा अर्ज

सेंट्रल रेल्वेने मेडिकल प्रॅक्टिशनर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या सरकारी नोकरीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची निवड केवळ इंटरव्ह्यूच्या आधारे होणार आहे.

  नवी दिल्ली, 7 जानेवारी : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. सेंट्रल रेल्वेने मेडिकल प्रॅक्टिशनर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या सरकारी नोकरीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची निवड केवळ इंटरव्ह्यूच्या आधारे होणार आहे. पात्र आणि योग्य उमेदवारांसाठी 11 जानेवारी 2022 साठी वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित केला जाणार आहे. याद्वारे एकूण 18 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. उमेदवारांची निवड तीन महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्टवर होईल. ही निड कायमस्वरुपी नसून तीन महिन्यांच्या करारावर केली जाणार आहे.

  JOB ALERT: रयत शिक्षण संस्थेत 'या' पदांच्या तब्बल 616 जागांसाठी भरती; करा अर्ज

  पद संख्या - चिकित्सक - 4 पदं एनेस्थेटिस्ट/ इंटेंसिविस्ट - 4 पदं GDMO - 10 पदं वयोमर्यादा - वयोमर्यादा 1 जानेवारी 2022 पर्यंत 53 वर्षाहून अधिक असू नये.

  JOB ALERT: राज्यातील 'या' GMC मध्ये 63 जागांसाठी भरती; मुलाखती झाल्या सुरु

  शैक्षणिक पात्रता - मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त मेडिसिनमधील डिग्री अर्थात MBBS GDMO - MBBS द्वारे मान्यताप्राप्त भारत सरकार वैद्यकीय परिषदेकडून मेडिसिनमधील पदवी असणं आवश्यक आहे.

  Government Jobs: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंईत 'या' पदांसाठी करतेय भरती

  कुठे होणार इंटरव्ह्यू? 11 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालय, मध्य रेल्वे, भायखळा मुंबई - 400027 येथे वॉक इन-इंटरव्ह्यू असणार आहे. या पदांसाठीची इतर संबंधित माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर मिळवू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Central government, Central railway, Job alert, Railway jobs

  पुढील बातम्या