BREAKING : CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

BREAKING : CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा धोका जगभरातील अनेक देशात निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. अशातच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता वेगळाच निर्णय

कोरोना काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम होता. मात्र 3 डिसेंबर रोजी या परीक्षेबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती दिली होती. '2021च्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याबाबत अद्याप चर्चा सुरू असून बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर केल्या जातील,' असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र ब्रिटनसारख्या काही देशांमध्ये कोरोना विषाणूचं नवं रूप समोर आल्यामुळे आता भारतातही खबरदारी घेण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून पुन्हा कडक नियम केले जात आहेत. त्यामुळे शाळांबाबतही आगामी काळात सरकार काय निर्णय घेतं, हे पाहावं लागेल.

First published: December 22, 2020, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading