मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये विविध पदांसाठी होणार भरती; बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये विविध पदांसाठी होणार भरती; बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    नवी दिल्ली, 15 जुलै:  सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये (Central Building research Institute recruitment) लवकरच विविध पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बारावी पास असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. जूनिअर सेक्रेट्रियेट असिस्टंट (Junior Secretariat Assistant) आणि जुनिअर स्टेनोग्राफर (Junior Stenographer) या पदासाठीच्या जागा रिक्त आहेत. यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी होणार भरती जूनिअर सेक्रेट्रियेट असिस्टंट - 08 पोस्ट जुनिअर स्टेनोग्राफर - 03 पोस्ट शैक्षणिक पात्रता जूनिअर सेक्रेट्रियेट असिस्टंट - पोस्ट बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तसंच टायपिंगचं शिक्षण असणंहे आवश्यक आहे. जुनिअर स्टेनोग्राफर - पोस्ट बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि प्रति मिनिट 80 शब्दांचा वेग आणि 50 मिनिटांत उतारा येणं आवश्यक आहे. हे वाचा - कोरोनामुळे जॉब मार्केटला फटका; इतक्या उमेदवारांची जॉब अप्लिकेशन झाली रिजेक्ट इतका मिळेल पगार जूनिअर सेक्रेट्रियेट असिस्टंट - 19900 - 63200 रुपये प्रतिमहिना जुनिअर स्टेनोग्राफर - 25500 - 81100 रुपये प्रतिमहिना सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या