Home /News /career /

CBSE चा बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता होणार जाहीर, येथे पाहा निकाल

CBSE चा बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता होणार जाहीर, येथे पाहा निकाल

CBSE 12th Result 2021: गेल्या अनेक दिवसांपासून CBSE चे विद्यार्थी आणि पालक 12 वीच्या निकालांच्या प्रतिक्षेत होते. अखेर तो दिवस आज आला आहे.

    नवी दिल्ली, 30 जुलै: गेल्या अनेक दिवसांपासून CBSE चे विद्यार्थी आणि पालक 12 वीच्या निकालांच्या प्रतिक्षेत होते. अखेर तो दिवस आज आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) 12 वीचा निकाल शुक्रवारी 30 जुलै रोजी म्हणजेच आज दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे. (CBSE 12th Result 2021) मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. (CBSE 12th Result 2021 Date, Time) या वेबसाईटवर बघता येणार निकाल CBSE दहावीचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपला दहावीचा निकाल बघू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना त्यांचा रोल नंबर एंटर करावा लागणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता असून बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मीम टाकून दिली निकालाची माहिती बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करताना बोर्डानं मीमचा आधार घेतला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Career, Career opportunities, CBSE, Exam result

    पुढील बातम्या