मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मेगाभरती; अ‍ॅप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; असे आहेत निकष

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मेगाभरती; अ‍ॅप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; असे आहेत निकष

सेंट्रल बँकेत नोकरीची संधी सोडूच नका

सेंट्रल बँकेत नोकरीची संधी सोडूच नका

बँकेने या संदर्भातील नोटिफिकेशन जारी केलं आहे. या पदांसाठी निकष, पात्रता, वेतन काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च:   तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुमारे 5000 अ‍ॅप्रेंटिसची पदं भरण्यात येत आहेत. या पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँक ऑफ इंडिया ही पदं विविध राज्यांमधील शाखांमध्ये भरणार असून त्यात महाराष्ट्रातील 629 पदांचा समावेश आहे. बँकेने या संदर्भातील नोटिफिकेशन जारी केलं आहे. या पदांसाठी निकष, पात्रता, वेतन काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया. `जागरणजोश डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (सीबीआय) अ‍ॅप्रेंटिस पदभरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. या भरती प्रक्रियेत सुमारे 5000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या साठी इच्छुक उमेदवार बँकेच्या centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटद्वारे 20 मार्च 2023पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2023 आहे.

लाखोंमध्ये पगार घेण्यासाठी MBA करायचंय? मग हे आहेत देशातील टॉप 5 इन्स्टिट्यूट्स; बघा लिस्ट

अ‍ॅप्रेंटिस पदासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेचा समकक्ष पदवीधर असावा. या पदासाठी किमान वयोमर्यादा 20 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे.

या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता उमेदवाराने सर्वप्रथम

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunityview/6412cbf5977ed17c321d25e2 या लिंकवर जात प्रोफाईल क्रिएट करावं. जर तुम्ही प्रोफाईल यापूर्वीच क्रिएट केलं असेल तर www.apprenticeshipindia.gov.in (apprenticeship Portal) वर जावे आणि लॉगिन करून अर्ज करावा. या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांशी ई-मेलच्या माध्यमातून कम्युनिकेशन केले जाईल. परीक्षा शुल्क भरण्यासाठी बँक तपशील बीएफएसआय एसएससीवर आहे. सर्व अर्जदारांना त्यांची वैयक्तिक माहिती, श्रेणी, पीडब्ल्यूडीसाठी लेखकाचे नाव लिहावे लागेल. उमेदवारांनी अर्ज करतेवेळी त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार 1,2,3 जिल्ह्यांची नावं निवडणं गरजेचे आहे. पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 400 रुपये +जीएसटी, एससी/ एसटी, महिला उमेदवारांसाठी 600 रुपये + जीएसटी तर इतर सर्व उमेदवारांसाठी 800 रुपये + जीएसटी असे आहे.

SBI Recruitment 2023: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नोकरी करण्याची संधी; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

अप्रेटिंस पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा (ऑब्जेटिव्ह टाइप), मुलाखत आणि लोकल लॅग्वेज प्रुफ याद्वारे केली जाणार आहे. या पदासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्यात येईल. ग्रामीण किंवा निमशहरी शाखेकरिता निवड झालेल्या उमेदवारास 10,000 रुपये स्टायपेंड दिला जाईल. शहरी भागातील शाखांकरिता निवड झाल्यास 15,000 रुपये तर मेट्रो शहरातील शाखांमध्ये निवड झाल्यास 20,000 रुपये स्टायपेंड दिला जाईल.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 2023 अ‍ॅप्रेंटिस पदभरती अंतर्गत गुजरातमध्ये 342, दादरा नगर हवेली आणि दीव-दमणमध्ये तीन, मध्य प्रदेशात 502, छत्तीसगडमध्ये 134, चंडीगडमध्ये 43, हरियाणात 108, पंजाबमध्ये 150, जम्मू-काश्मीरमध्ये 26, हिमाचल प्रदेशात 63, तमिळनाडूत 100, पुद्दुचेरीत एक, केरळमध्ये 136, राजस्थानमध्ये 192, दिल्लीत 141, आसाममध्ये 135, मणिपूरमध्ये नऊ, नागालँडमध्ये सात, अरुणाचल प्रदेशात आठ, मिझोराममध्ये दोन, मेघालयमध्ये आठ, त्रिपुरात चार, कर्नाटकात 70, तेलंगणात 106, आंध्र प्रदेशात 141, उडिशात 112, पश्चिम बंगालमध्ये 362, अंदमान - निकोबारमध्ये एक, सिक्कीममध्ये 16, उत्तर प्रदेशात 615, गोव्यात 44, महाराष्ट्रात 629, बिहारमध्ये 526, झारखंडमध्ये 46 पदं भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बँकेची अधिकृत नोटिफिकेशन वाचावं.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams