Home /News /career /

CAD Recruitment 2021: केंद्रीय दारुगोळा डेपोमध्ये विविध जागांसाठी पदभरती; लगेचच करा अर्ज

CAD Recruitment 2021: केंद्रीय दारुगोळा डेपोमध्ये विविध जागांसाठी पदभरती; लगेचच करा अर्ज

यात विविध पदांसाठी 21 जागा रिक्त आहेत.

    पुलगाव, 03 जुलै: भारत सरकारच्या (Government of India) संरक्षण मंत्रालयाअंतर्गत (Ministry of Defense) येणाऱ्या केंद्रीय दारुगोळा डेपो (Central Ammunition Depot CAD) मध्ये लवकरच पदभरती होणार आहे. या भर्तीसाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात अली आहे. पुलगाव इथल्या प्लांटसाठी ही पदभरती होणार आहे. यात विविध पदांसाठी 21 जागा रिक्त आहेत.  या जागांसाठी होणार पदभरती ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) - 08 फायरमन - 03 ट्रेड्समन मेट - 08 व्हेईकल मेकॅनिक  - 01 टेलर - 01 एकूण जागा - 21 हे वाचा - विद्यार्थ्यांनो, Google मध्ये इंटर्नशिप करायची आहे? मग फॉलो करा या टिप्स शैक्षणिक पात्रता ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) - 12वी उत्तीर्ण आणि  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. आणि हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि. फायरमन - 10वी उत्तीर्ण ट्रेड्समन मेट - 10वी उत्तीर्ण व्हेईकल मेकॅनिक  - 10वी उत्तीर्ण आणि ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा तीन वर्षांचा अनुभव टेलर - 10वी उत्तीर्ण आणि ITI  (टेलर ) किंवा तीन वर्षांचा अनुभव अर्ज पाठवण्याचा पत्ता - Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या