• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Engineering Jobs: सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये इंजिनिअर्सना रोजगाराची संधी; असा करा अर्ज

Engineering Jobs: सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये इंजिनिअर्सना रोजगाराची संधी; असा करा अर्ज

एकूण 46 पदांसाठी ही भरती होणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून : शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक इंजिनिअर्सना (Engineering jobs) जॉब मिळू शकत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे रोजगाराच्या संधीची कमतरता.  आता इंजिनिअर्सना सरकारी नोकरी (Latest Government Jobs) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (Cement Corporation of India) इंजिनिअर्ससाठी पदभरती होणार आहे. दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवल्यानंतर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. एकूण 46 पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी पदभरती अधिकारी (Officer) अभियंता (Engineer) शैक्षणिक पात्रता अधिकारी (Officer) - डिग्री, पदव्युत्तर डिग्री तसचं LLB, CA, MBA किंवा ICWA अभियंता (Engineer) - मेकॅनिकल (Mechanical), इलेक्ट्रिकल (Electrical), मायनिंग (Mining) किंवा सिव्हिल (Civil) इंजिनिअरिंगमध्ये डिग्री हे वाचा - BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी पदभरती; लगेचच करा अप्लाय असा करा अर्ज अर्ज करण्यासाठी https://www.cciltd.in/page.php?id=216 या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करावा लागेल. तसंच उमेदवारांच्या पात्रतेवर आणि अनुभवानुसार निवड करण्यात येईल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2021 या पदभरतीबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: