• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Job Alert: पणजी महानगरपालिकेत विविध पदांसाठी होणार भरती; बारावी पास उमेदवारांना संधी

Job Alert: पणजी महानगरपालिकेत विविध पदांसाठी होणार भरती; बारावी पास उमेदवारांना संधी

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

  • Share this:
    पणजी (गोवा), 11 जुलै: गोवा (Goa) राज्याची राजधानी पणजी (Panaji) शहराच्या महानगरपालिकेत विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन लिपिक या पदांवर भरती करण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk) शेक्षणिक पात्रता या जागांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच टायपिंग येणं अनिवार्य आहे. हे वाचा - दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Indian Navy मध्ये नोकरीची संधी; हे गुण असणं आवश्यक अर्ज पाठवण्याचा पत्ता पणजी शहर महानगरपालिका, पणजी,  गोवा अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: