मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

आणखी किती उशीर? CBSE निकाल आणि मूल्यांकन पद्धतीबद्दल अजूनही स्पष्टता नाही; विद्यार्थी म्हणतात...

आणखी किती उशीर? CBSE निकाल आणि मूल्यांकन पद्धतीबद्दल अजूनही स्पष्टता नाही; विद्यार्थी म्हणतात...

CBSE Results 2022

CBSE Results 2022

यंदा दोन टर्ममध्ये परीक्षा झाल्यामुळे नक्की मूल्यांकन पद्धत कशी असणार याबद्दलही अजून स्पष्टता नाही. त्यामुळे पालकांनाही टेन्शन आलं आहे. "आणखी किती उशीर?" असा सवाल आता विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर विचारण्यास सुरुवात केली आहे.

  मुंबई, 19 जुलै: परीक्षा संपून कित्येक दिवस उलटून गेलेत तरी अजूनही CBSE चा टर्म दोन चा निकाल (CBSE Term 2 Results Updates 2022) अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या किहत्येक दिवसांपासून या निकालाची वाट बघत आहेत. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आता आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. यंदा दोन टर्ममध्ये परीक्षा झाल्यामुळे नक्की मूल्यांकन पद्धत कशी असणार याबद्दलही अजून स्पष्टता नाही. त्यामुळे पालकांनाही टेन्शन आलं आहे. "आणखी किती उशीर?" असा सवाल आता विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर विचारण्यास सुरुवात केली आहे. MPSC असो वा JEE कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; असा करा अभ्यास
  अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सीबीएसईने अद्याप निकाल जाहीर न केल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. यासोबतच मूल्यांकन योजना जाहीर करण्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे, त्या आधारे निकाल तयार केले जातील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या. अशा परिस्थितीत कोणत्या टर्म परीक्षेला अधिक महत्त्व दिले जाईल किंवा दोन्ही टर्मचे गुण समान जोडले जातील, याबद्दल सीबीएसईने अद्याप माहिती दिलेली नाही.
  CISCE आणि इतर बोर्डांनी टर्म 1 आणि टर्म 2 दोन्हीला समान महत्त्व दिले आहे. मात्र सीबीएसईचे विद्यार्थी नव्या फॉर्म्युल्यानुसार निकाल जाहीर करण्याची मागणी करत आहेत. ते म्हणतात की विद्यार्थ्याने ज्या एका टर्ममध्ये चांगली कामगिरी केली आहे त्या आधारे बोर्डाने निकाल जाहीर करावा. याशिवाय CBSE 10वी, 12वी बोर्डाच्या निकालांना उशीर होत असल्याबद्दल विद्यार्थी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहेत. ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
  मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई 10वी, 12वीचे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होतील. सध्या, विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि अधिकृत सोशल मीडिया हँडलवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय, विद्यार्थी hindi.news18.com वर निकालाशी संबंधित सर्व अपडेट्स देखील पाहू शकतील.
  First published:

  Tags: CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022, Exam result

  पुढील बातम्या