Home /News /career /

CBSE Results: इंटरनेट नसेल, वेबसाईट क्रॅश झाली तरी नो प्रॉब्लेम; फक्त करा एक SMS दुसऱ्या क्षणी मिळेल निकाल

CBSE Results: इंटरनेट नसेल, वेबसाईट क्रॅश झाली तरी नो प्रॉब्लेम; फक्त करा एक SMS दुसऱ्या क्षणी मिळेल निकाल

SMS द्वारेही निकाल बघण्याची सोय

SMS द्वारेही निकाल बघण्याची सोय

यंदा SMS द्वारेही निकाल बघण्याची सोय (how to check CBSE result just by SMS) करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना फक्त एक SMS पाठवून आपला निकाल बघता येणार आहे. जाणून घेऊया नक्की कसा बघता येईल निकाल.

    मुंबई, 06 जुलै: 'सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ने (CBSE Term 2 result 2022) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित होतं. त्यानुसार आता CBSE चा दहावीचा निकाल (CBSE Result 2022) हा उद्या म्हणजेच 04 जुलैला जाहीर होणार असं सांगण्यात येत होतं. मात्र आजही अजून CBSE चा निकाल जाहीर झाला नाही. मात्र हा निकाल लवकरच जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे किंवा पाऊस आणि पुरस्थितीमुळे जिथे इंटरनेट सेवा बंद झाली आहे अशा भागातील विद्यार्थ्यांना आता घाबरून जाण्याची गरज नाही. कारण CBSE बोर्डातर्फे यंदा SMS द्वारेही निकाल बघण्याची सोय (how to check CBSE result just by SMS) करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना फक्त एक SMS पाठवून आपला निकाल बघता येणार आहे. जाणून घेऊया नक्की कसा बघता येईल निकाल. रेल्वेत सुसाट वेगानं मिळतील जॉब्स; कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांसाठी मेगाभरती; इथे बघा डेटल्स इंटरनेट नसतानाही विद्यार्थी एसएमएसद्वारे निकाल पाहू शकतील. यासाठी त्यांना त्यांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन CBSE 10 किंवा CBSE 12 टाइप करून स्पेस द्यावी लागेल. त्यानंतर रोल नंबर टाका आणि 5676750 वर पाठवा. परिणाम स्क्रीनवर प्रदर्शित होईल. काही वेळा वेबसाईट क्रॅश झाली तरी या माध्यमातून निकाल तपासला जातो. कधी मिळेल CBSE बोर्डाची मार्कशीट CBSE बोर्डाचा निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर 11वी आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांत विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेची मार्कशीट मिळेल. तोपर्यंत काही गरज भासल्यास ते तात्पुरती गुणपत्रिका वापरू शकतात. आली रे आली जॉबची वेळ आली! राज्यातील 'या' GMC मध्ये 60,000 रुपये पगाराची नोकरी का होतोय निकालाला उशीर CBSE बोर्ड हे केंद्रीय स्तरावरील बोर्ड आहे. यामध्ये देशातील विविध राज्यांव्यतिरिक्त परदेशातील शहरातील विद्यार्थीही सहभागी होतात. CBSE बोर्ड 10वी आणि 12वी चे मूल्यांकनाचे काम संपले आहे पण तरीही निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे (CBSE बोर्ड निकाल 2022). वास्तविक, बोर्डाला आतापर्यंत अनेक केंद्रांवरून तपासलेल्या उत्तराच्या प्रती मिळू शकलेल्या नाहीत म्हणून निकाल जाहीर होण्यास उशीर होत असल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022, Exam result, Job, Job alert

    पुढील बातम्या