मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

"अजून किती वेळ?" निकाल लागून महिना उलटला तरीही 11वी प्रवेश सुरु होईना; विद्यार्थी, पालकांचे हाल

"अजून किती वेळ?" निकाल लागून महिना उलटला तरीही 11वी प्रवेश सुरु होईना; विद्यार्थी, पालकांचे हाल

11वी प्रवेश सुरु होईना विद्यार्थी, पालकांचे हाल

11वी प्रवेश सुरु होईना विद्यार्थी, पालकांचे हाल

आता अकरावी प्रवेश (11th standard admission process in Maharashtra) आणि पदवीपूर्व प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वाट बघावी लागत आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 14 जुलै: राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि पुढच्या वर्गातल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु 'सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ने (CBSE Term 2 result 2022) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित होतं. मर UGC ना दिलेल्या माहितीने CBSE च्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची अक्षरशः झोप उडवली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या सूचनेनुसार, यास सुमारे महिनाभराचा कालावधी लागू शकतो. “टर्म-एलची कामगिरी आधीच शाळांना कळवण्यात आली आहे. टर्म-ll चे मूल्यमापन सुरू आहे आणि निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दोन्ही पदांच्या कामगिरीवर आधारित वेटेज एकत्र करून अंतिम निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर होण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेस सुमारे एक महिन्याचा कालावधी लागेल,” यूजीसीने आपल्या ताज्या नोटिसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेश (11th standard admission process in Maharashtra) आणि पदवीपूर्व प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वाट बघावी लागत आहे. यापूर्वी, सीबीएसईच्या सूत्रांनी सांगितले होते की जुलै अखेरपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. आता, विद्यार्थ्यांना जुलैच्या अखेरीस इयत्ता 12वीचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 10वीचा निकाल अपेक्षित आहे. 2020 मध्ये निकाल 30 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आणि 2021 मध्ये 12वीच्या जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टमध्ये 10वीचा निकाल जाहीर झाला. या वर्षीही अशीच टाइमलाइन अपेक्षित आहे. या वर्षी दोन टर्म परीक्षा असून अंतिम निकाल काढण्याचे सूत्र ठरलेले नसल्याने हा विलंब होत आहे. सूत्रामध्ये टर्म 1, आणि टर्म 2 चे निकाल तसेच अंतर्गत मूल्यांकन यांचा समावेश असेल, मात्र अचूक वेटेज अद्याप घोषित केलेले नाही. IIT व्यतिरिक्त 'हे' आहेत देशातील टॉप Engineering कॉलेजेस; JEE मार्कांवर प्रवेश
“हे लक्षात आले आहे की काही विद्यापीठांनी पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू केली आहे, या परिस्थितीत सीबीएसईचे विद्यार्थी पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहतील. CBSE निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यापीठांनी अंतिम तारीख निश्चित केली असल्यास अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात अडचण येऊ शकते." असंही UGC नं म्हंटल आहे त्यामुळे जरी मुंबई विद्यापीठानं या आधी मेरिट लिस्ट जाहीर केली असली तरी UGC च्या सूचनांनुसार अकरावी प्रवेश फ्रीझ करून ठेवावं लागणार असल्याची चिन्हं आहेत.
इतक्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी मुंबई – 2,77,879 पुणे – 90,852 नागपूर – 31,714 नाशिक- 25,083 अमरावती – 10,521 IT क्षेत्रात नोकरीची संधी! फ्लिपकार्ट, अमेझॉनमध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती
विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशात 10 टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे अकरावीच्याच ऑनलाईन प्रवेशासाठी शिक्षण विभाग केंद्रीय बोडींच्या निकालाची प्रतीक्षा करीत असून सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेशाच्या गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या या दोन परस्पर विरोधी भूमिकांमुळे चांगलाच गोंधळ उडालेला आहे.
First published:

Tags: Career, Career opportunities, CBSE 10th, CBSE 12th, Education

पुढील बातम्या