मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE Term 2 Exam: विद्यार्थ्यांनो, टर्म 2 परीक्षेच्या तयारीला करा सुरुवात; अशाप्रकारे द्या Mock टेस्ट

CBSE Term 2 Exam: विद्यार्थ्यांनो, टर्म 2 परीक्षेच्या तयारीला करा सुरुवात; अशाप्रकारे द्या Mock टेस्ट

जर तुम्ही 2022 च्या बोर्ड परीक्षेला बसणार असाल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

जर तुम्ही 2022 च्या बोर्ड परीक्षेला बसणार असाल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

जर तुम्ही 2022 च्या बोर्ड परीक्षेला बसणार असाल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 डिसेंबर: 2020 आणि 2021 मध्ये, भारतात कोरोनाव्हायरसमुळे, CBSE बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या (CBSE Board Exams). त्यामुळेच मागील वर्षांच्या परिस्थितीतून धडा घेत सीबीएसई बोर्डाने विशेष तयारी (CBSE exam Preparation) केली आहे. जर तुम्ही 2022 च्या बोर्ड परीक्षेला बसणार असाल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

भारतातील कोरोनाव्हायरसच्या प्रसारामुळे बिघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन, CBSE बोर्ड 2022 च्या परीक्षा 2 टर्ममध्ये (CBSE Term 2 Exam) आयोजित करत आहे. या अंतर्गत, CBSE प्रथम टर्म बोर्ड परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आल्या आहेत आणि कोविड 19 ची परिस्थिती लक्षात घेऊन टर्म 2 च्या परीक्षांबाबत (CBSE Term 2 Exam date) निर्णय घेतला जाणार आहे. टर्म 1 ची परीक्षा पार पडली असून आता येत्या काही दिवसातच निकाल (CBSE Term 1 Exam Result) जाहीर होणार आहे. मात्र आता सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष CBSE टर्म 2 परीक्षांकडे लागलं आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणारा आहोत ज्यामुळे तुम्ही CBSE टर्म 2 परीक्षांचा निकाल चांगल्या पद्धतीनं करू शकाल.

Career Tips: 'या' देशांमध्ये नोकरी मिळाली तर मिळेल भरघोस पगार; चान्स सोडू नका

CBSE बोर्डाच्या 10 व्या वर्गाच्या टर्म 1 च्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत . मात्र यावेळी निकालाची वाट पाहण्यापेक्षा आपल्या टर्म 2 परीक्षांची  तयारी सुरू करणे चांगले आहे. बोर्डाने टर्म 2 बोर्ड परीक्षेशी संबंधित आवश्यक तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अपडेट केले आहेत. टर्म 1 परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता टर्म 2 परीक्षांच्या अभ्यासाकडे वळणं आवश्यक आहे.

अशी होईल टर्म 2 परीक्षा

CBSE इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 बोर्ड परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेतली जाईल . टर्म 2 ची परीक्षा 2 तासांसाठी घेतली जाईल आणि त्यात केस आधारित, परिस्थितीवर आधारित, ओपन एंडेड लहान उत्तरे आणि लांब उत्तर प्रकारचे प्रश्न असतील. विद्यार्थ्यांनी त्यानुसार तयारी सुरू करावी . काही कारणास्तव वर्णनात्मक चाचणी शक्य नसल्यास टर्म 1 प्रमाणे MCQ आधारित प्रश्न पुन्हा विचारले जातील.

CBSE Result: 10वी 12वीचे सर्व विद्यार्थी होणार Pass; लवकरच जाहीर होणार निकाल

अशा पद्धतीनं द्या Mock टेस्ट

CBSE बोर्डाने (CBSE Term 2 Exam Mock Test) त्यांच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर सर्व विषय आणि अध्यायनिहाय मॉक टेस्ट अपलोड (CBSE Term 2 Exam Mock test site) केल्या आहेत. CBSE बोर्ड टर्म 2 ची परीक्षा त्याच मॉक टेस्टच्या आधारे घेतली जाईल. आता सराव सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सोपी होईल.

First published:

Tags: Board Exam, CBSE, Exam result, Tips