• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • CBSE Term1 Exam 2021: 10वी,12वीच्या विध्यार्थ्यांसाठी आणि शाळांसाठी CBSE नं जारी केले निर्देश; वाचा डिटेल्स

CBSE Term1 Exam 2021: 10वी,12वीच्या विध्यार्थ्यांसाठी आणि शाळांसाठी CBSE नं जारी केले निर्देश; वाचा डिटेल्स

परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना (Rules for CBSE Term 1 Exam 2021) जारी केल्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE टर्म 1 परीक्षा 2021 (CBSE Term 1 Exam 2021) साठी बसलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. इयत्ता 10 वी, 12 वी साठी टर्म 1 परीक्षा (CBSE Term 1 Exam 2021 Exam date) नोव्हेंबर 2021 मध्ये होणार आहे. 10वीची पहिली परीक्षा 17 नोव्हेंबरपासून तर 12वीची परीक्षा 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. परीक्षा सकाळी 10.30 ऐवजी 11.30 वाजता सुरू होईल. सर्व श्रेणींसाठी, उमेदवारांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे वाचन वेळ मिळेल. परीक्षेच्या कालावधीसोबतच CBSE ने परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनाही (Rules for CBSE Term 1 Exam 2021) जारी केल्या आहेत. परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना बोर्डाने 5 जुलै 2021 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यांकनाचे काम पूर्ण केले जाईल आणि 23 डिसेंबर 2021 पर्यंत CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर गुण अपलोड केले जातील. 23 डिसेंबर 2021 पर्यंत शाळांनी गुण अपलोड न केल्यास, अंतिम तारखेनंतर शाळांनी सादर केलेल्या गुणांचा विचार करून बोर्ड 50000/- च्या दंडासह त्या शाळांवर कारवाई करू शकते. Career in Railway: लोको पायलट होण्याचं स्वप्न बघताय? मग द्या या परीक्षा परीक्षा आयोजित करण्यासाठी बोर्ड वेबिनार, वेबिनार, मुल्यांकन, प्रशिक्षण कार्यक्रम आणि व्हिडिओ यांसारखे क्षमता वाढवणारे कार्यक्रम आयोजित करेल. CBSE विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन OMR देईल. शाळांना दहावी, बारावी या दोन्ही वर्गांसाठी ओएमआर डाउनलोड करण्याची परवानगी असेल. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना रफ कामासाठी स्वतंत्र शीट मिळेल. परीक्षा आयोजित करण्यासाठी बोर्डाने सीएसला जारी केलेल्या कोविड-19 सूचनांचे शाळांना काटेकोरपणे पालन करावे लागेल. बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे 9 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अपलोड केली जातील.
  Published by:Atharva Mahankal
  First published: