नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसईनं (CBSE) 12 वीच्या विशेष परीक्षेचा निकाल (CBSE Result 2021) आपल्या अधिकृत वेबसाइटवरलवकरच जाहीर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सीबीएसईने 12 वी खाजगी विद्यार्थ्यांचे निकाल (CBSE Result 2021) आणि विशेष परीक्षा 30 सप्टेंबर 2021 (CBSE special Exam Result 2021) पर्यंत जाहीर करण्याचं सांगितलं होतं. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या विशेष परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकणार आहेत.
CBSE च्या विशेष परीक्षेचा निकाल आणि खासगी विद्यार्थ्यांचा निकाल (CBSE Result for Private Students) 30 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी बारा वाजता लावण्यात येणार आहे. हा निकाल CBSE च्या cbseresults.nic.in. Cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात येणार आहे.
CBSE नं यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाच्या कारणामुळे रद्द केल्या होत्या. त्यामुले विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. मात्र काही विद्यार्थ्यांना या निकालावर आक्षेप होता. म्हणून CBSE कडून ही विशेष परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा आता निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हे वाचा - खूशखबर! आता ज्येष्ठ नागरिकांनाही सहज मिळणार नोकरी,सुरू होतंय Employment Exchange
Digi Locker वर बघता येणार निकाल
विद्यार्थी त्यांचा निकाल Digi Locker वरही बघू शकणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना Digi Locker डाउनलोड करून त्यामध्ये View Result वर क्लिक कर करून निकाल बघता येणार आहे. View Result वर क्लिक केल्यानंतर तिथे तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा. यानंतर Submit वर क्लिक करा. अशा पद्धतीनं तुम्हाला निकाल बघता येणार आहे.
हे वाचा - Google Recruitment 2021: गुगलमध्ये 'या' पदांच्या IT प्रोफेशनल्ससाठी मोठी भरती
पुन्हा होणार MHT-CET परीक्षा
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rain in Marathwada and north Maharashtra) पडत आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने विद्यार्थी एमएचटी सीईटी परीक्षे (MHT-CET exam) साठी पोहोचू शकले नाहीत. या प्रकरणाची दखल आता राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोहोचता आलेले नाही असे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, CBSE, Exam, Exam result