मुंबई, 22 जून: काही दिवसांआधी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची (
CBSE Board Exam Results 2022). यंदा CBSE नं दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म एक परीक्षा तर एप्रिल-मे महिन्यात टर्म दोन परीक्षा पार पडली होती. म्हणूनच आता विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती वाढू लागली आहे. निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. याच CBSE च्या निकालांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट सम्पवर येतेय.
CBSE बोर्ड इयत्ता 10वीच्या प्रतींचे मूल्यांकन करण्याचे काम 22 दिवसांत पूर्ण करायचे होते. असा अंदाज वर्तवला जात आहे की बोर्ड लवकरच सीबीएसई 10वीचा निकाल जाहीर करेल. मात्र निकालातील चुका टाळण्यासाठी CBSE नं एक मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक उत्तरपत्रिका ही दोनदा तपासली
(CBSE Results 2022) गेली आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका ही दोनदा तपासली गेली आहे. अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे यंदाचा निकाल हा कोणत्याही त्रुटीशिवाय जाहीर होण्याची शक्यता आहे.
JOBS: 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 60,000 रुपये पगाराच्या जॉबची बंपर लॉटरी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या महिन्यात आणि जुलै महिन्यात इयत्ता 10वी टर्म 2 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते, तर 12वीचा निकाल 2022 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. CBSE सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार इयत्ता 10वीचा निकाल जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल, पुढच्या महिन्यात 12वीचा निकाल 2022 ला अपेक्षित आहे.
"CBSE इयत्ता 10वी परीक्षा 2022 साठी मूल्यमापन प्रक्रिया जवळपास संपली आहे, निकालाची तारीख लवकरच निश्चित केली जाईल." CBSE इयत्ता 10, 12 चे निकाल जाहीर झाल्यावर cbse.gov.in, cbresults.nic.in वर उपलब्ध होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
किमान 30 टक्के गुण आवश्यक
26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत झालेल्या CBSE 10वी, 12वी टर्म 2 2022 च्या परीक्षेसाठी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. 2022 मध्ये एकूण 21 लाख विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेला बसले होते, तर 14 लाख विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये इयत्ता 12 ची परीक्षा दिली होती. दहावी, बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 30 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
प्रचंड राजकीय घडामोडींमध्येही ठाणे महापालिकेत 'या' पदांसाठी भरतीची घोषणा
दहावीचा निकाल आधी?
जर आपण मागील वर्षाच्या ट्रेंडवर नजर टाकली तर सीबीएसई 10वीचा निकाल आधी जाहीर करत आहे. अशा स्थितीत यंदाही दहावीचा निकाल बोर्डाकडून लवकर जाहीर होऊ शकतो. त्यानंतर 1 ते 2 दिवसांनी 12वीचा निकाल जाहीर होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.