मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE Results 2022: निकालाबाबत मोठी अपडेट आली समोर; 'या' तारखांना रिझल्ट जाहीर होण्याची शक्यता

CBSE Results 2022: निकालाबाबत मोठी अपडेट आली समोर; 'या' तारखांना रिझल्ट जाहीर होण्याची शक्यता

यंदा ऑफलाईन परीक्षा घेऊनही अजून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र आता निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

यंदा ऑफलाईन परीक्षा घेऊनही अजून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र आता निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

यंदा ऑफलाईन परीक्षा घेऊनही अजून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र आता निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 18 जुलै: 10 वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल (CBSE Result 2022) जाहीर करण्यास तयार असल्याने निकालाच्या गणनेच्या सूत्राबाबत वादविवाद अजूनही सुरू आहेत. CBSE च्या इतिहासात प्रथमच, 10वी आणि 12वी दोन टर्ममध्ये विभागली गेली. अभ्यासक्रमाचे दोन भाग केले. अभ्यासक्रमाचा पहिला भाग टर्म 1 मध्ये आणि दुसरा अर्धा टर्म 2 मध्ये होता. टर्म 1 च्या परीक्षा MCQ-आधारित होत्या आणि टर्म 2 परीक्षा लेखी होती. गतवर्षी बोर्डाला परीक्षेशिवाय निकाल (CBSE Term 2 Results 2022) जाहीर करावे लागत असल्याने बोर्डाने नेहमीच्या परीक्षेच्या हंगामापूर्वी एक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यंदा ऑफलाईन परीक्षा घेऊनही अजून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र आता निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. देशातील जवळपास सर्वच राज्य मंडळांचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे CBSE बोर्ड 10वी 12वीचा निकाल कधी लागेल याबाबत अधिकृत अपडेट नाही. दरम्यान, असे मानले जात आहे की सीबीएसई 10वी आणि 12वीच्या निकालांच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. CBSE दहावीचा निकाल हा येत्या 22 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर यानंतर बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ICSE Results: ICSE बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर; या स्टेप्स फॉलो करून बघा निकाल
या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 21 लाख विद्यार्थी बसले होते. ज्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलै महिन्यात निकाल जाहीर होईल. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत घोषणेची अद्याप प्रतीक्षा आहे.
निकालाची सर्व तयारी पूर्ण बोर्डाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, दहावी आणि बारावीच्या निकालाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रतींचे मूल्यांकन केल्यानंतर निकाल पोर्टलवर क्रमांक अपलोड करण्यात आला आहे. निकाल या वेबसाइट्सवर उपलब्ध  cbseresults.nic.in cbse.gov.in parikshasangam.cbse.gov.in CISCE चा मूल्यांकनाचा फॉर्मुला ठरला; CBSE अजूनही संभ्रमात? काय असेल निर्णय असा चेक करा निकाल सर्वप्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या. येथे मुख्यपृष्ठावर जाऊन, CBSE 10वी निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल, लॉगिन तपशीलांमध्ये रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. सबमिट केल्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि तपासा. भविष्यासाठी त्याची प्रिंट काढा.
First published:

Tags: CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022, Exam result

पुढील बातम्या