मुंबई, 20 जून: काही दिवसांआधी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल (Maharashtra state board results 2022) जाहीर झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची (CBSE board results 2022). यंदा CBSE नं दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म एक परीक्षा तर एप्रिल-मे महिन्यात टर्म दोन परीक्षा (CBSE term2 results 2022) पार पडली होती. म्हणूनच आता विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती वाढू लागली आहे. निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. याच CBSE च्या निकालांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट (CBSE Results latest updates) येतेय.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या महिन्यात आणि जुलै महिन्यात इयत्ता 10वी टर्म 2 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते, तर 12वीचा निकाल 2022 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. CBSE सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार इयत्ता 10वीचा निकाल जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल, पुढच्या महिन्यात 12वीचा निकाल 2022 ला अपेक्षित आहे.
Agnipath Scheme: प्रचंड गदारोळातही अखेर अग्निपथ योजनेचं नोटीफिकेशन जारी; या तारखेपासून सुरू होईल नोंदणी
"CBSE इयत्ता 10वी परीक्षा 2022 साठी मूल्यमापन प्रक्रिया जवळपास संपली आहे, निकालाची तारीख लवकरच निश्चित केली जाईल." CBSE इयत्ता 10, 12 चे निकाल जाहीर झाल्यावर cbse.gov.in, cbresults.nic.in वर उपलब्ध होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
किमान 30 टक्के गुण आवश्यक
26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत झालेल्या CBSE 10वी, 12वी टर्म 2 2022 च्या परीक्षेसाठी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. 2022 मध्ये एकूण 21 लाख विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेला बसले होते, तर 14 लाख विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये इयत्ता 12 ची परीक्षा दिली होती. दहावी, बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 30 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
"ही तर फक्त सुरुवात, येत्या काही वर्षांमध्ये सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती"; तीनही दलांच्या प्रमुखांची माहितीअशा पद्धतीनं डाउनलोड करा निकाल
सुरुवातीला अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in, cbresults.nic.in ला भेट द्या.
यानंतर इयत्ता 10, 12 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर नोंदणी क्रमांक / रोल नंबर प्रविष्ट करा.
इयत्ता 10, 12 चा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
10वी, 12वी स्कोअरकार्ड डाउनलोड करा
निकालाची किंवा सॉकर कार्डची प्रिंट घ्याय;या विसरू नका.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.