Home /News /career /

CBSE result 2022: निकालाबाबतची सर्वात मोठी अपडेट; 'या' तारखांना Result जाहीर होण्याची शक्यता

CBSE result 2022: निकालाबाबतची सर्वात मोठी अपडेट; 'या' तारखांना Result जाहीर होण्याची शक्यता

निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. याच CBSE च्या निकालांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट (CBSE Result latest updates) येतेय.

    मुंबई, 28 जून: काही दिवसांआधी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची. यंदा CBSE नं दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा (CBSE result 2022) ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म एक परीक्षा तर एप्रिल-मे महिन्यात टर्म दोन परीक्षा (CBSE Term 2 exam result 2022) पार पडली होती. म्हणूनच आता विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती वाढू लागली आहे. निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. याच CBSE च्या निकालांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट (CBSE Result latest updates) येतेय. सीबीएसई 10वीचा निकाल या महिन्यात आणि 12वीचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. CBSE प्रथम 10वीचा निकाल जाहीर करेल. CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतील. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन हवंय? मग बघा प्रमुख बॅंकांचे व्याजदर
    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा संपल्यानंतर 20 दिवसांत निकाल जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून बोर्ड या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. CBSE 10वी, 12वी टर्म-2 परीक्षा 2022 मध्ये सुमारे 35 लाख विद्यार्थी बसले होते. 10वीची परीक्षा 21 लाख आणि 12वीची परीक्षा 14 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती.
    परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर? सीबीएसई 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी, ज्यांचे गुण अपेक्षेप्रमाणे येणार नाहीत, त्यांनीही निराश होण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना कॉपीची छाननी करता येते. यासाठी प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्यास कंपार्टमेंट परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊ शकता. कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया निकाल जाहीर झाल्यापासून 10 ते 15 दिवसांत सुरू होते. सुप्रीम कोर्टात वकील व्हायचंय? मग शिक्षण आणि पात्रतेविषयी इथे मिळेल माहिती
    असा चेक करा निकाल
    CBSE बोर्डाचा 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी लिंक सापडतील. आता तुम्हाला ज्या वर्गाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून आवश्यक तपशील सबमिट करावा लागेल. तुम्ही सबमिट करताच तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022, Job alert

    पुढील बातम्या