CBSE बोर्डाची दहावी-बारावीची परीक्षा आजपासून, 30 लाख विद्यार्थी देणार पेपर

CBSE बोर्डाची दहावी-बारावीची परीक्षा आजपासून, 30 लाख विद्यार्थी देणार पेपर

दहावीची परीक्षा 20 मार्च तर बारावीची परीक्षा 30 मार्चपर्यंत असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : CBSC बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. साधारण 30 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. सीबीएसई बोर्डाची इयत्ता 10 वी आणि 12वीची परीक्षा सुरु झाली आहे. दहावीची परीक्षा 20 मार्च तर बारावीची परीक्षा 30 मार्चपर्यंत असणार आहे. यंदा दहावीचे 18 लाख आणि बारावीचे 12 लाख असे मिळून एकूण 30 लाख विद्यार्थी CBSC बोर्डाची परीक्षा देणार आहेत.

दहावीसाठी 5 हजार 376 परीक्षा केंद्रांवर तर बारावीसाठी एक हजार 883 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता या परीक्षेला सुरुवात झाली आहे. जे विद्यार्थी शाळेचं अथवा आपल्या महाविद्यालयाचं आयडी कार्ड आणि हॉल तिकीट घेऊन येणार नाहीत त्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या सोबत घेऊन परीक्षेला बसण्याती सूचना शिक्षकांकडून देण्यात आल्या आहेत. सकाळी 10 वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियमानुसार 9.45 पर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षागृहात पोहोचणं अपेक्षित आहे. उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षागृहात घेतलं जाणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-Board Exam : परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला काहीच आठवलं नाही तर काय कराल?

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा 03 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वेळापत्रक नीट माहीत नसते किंवा आपला गोंधळ होतो. अशावेळी हा गोंधळ टाळण्यासाठी आपण वेळपत्रक नीट पाहाणं महत्त्वाचं आहे. वेळापत्रक पाहिलं नाही तर आपण चुकीच्या विषयाचा अभ्यास करू किंवा कदाचित एखादा पेपरही चुकण्याची शक्यता आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर http://www.mahahsscboard.in/ पाहाता येणार आहे.

सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना 'न्यूज 18 लोकमत'कडून ALL The Best!

हेही वाचा-परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवा 7 गोष्टी

First published: February 15, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading