नवी दिल्ली, 24 मार्च: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धत आणि अभ्यास आमूलाग्र बदलण्यात येणार आहे. यापुढे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठी ज्ञानाधारित शिक्षणाच्या तत्त्वावर आधारित त्यांचं मूल्यमापन (CBSE new assessment framework) केलं जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (National Education Policy - NEP)हे बदल करण्यात येणार आहेत.
CBSE ने मुख्यतः तीन विषयांसाठी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात बदल करायचं ठरवलं आहे. यामध्ये इंग्लिश (वाचन), विज्ञान आणि गणित या तीन विषयांचा समावेश आहे, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.
हेही वाचा: वडिल वारले, आईनं केली आत्महत्या, तो मात्र हिंमत न हारता पोलिस बनला
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक (Ramesh Pokhrial Nishank) यांनी गेल्या वर्षी नवं शिक्षण धोरण मांडलं. त्याअनुषंगाने मूल्यमापन पद्धतीत फेरबदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं.
कधी होणार बदल?
प्रामुख्याने तीन विषयांच्या शिक्षण आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत म्हणजेच परीक्षेत बदल होणार आहे. पुढच्या तीन ते चार वर्षात टप्प्याटप्प्याने हे बदल करण्यात येतील. केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि चंदिगढच्या केंद्रशासित प्रदेशातल्या शाळांमध्ये नवीन परीक्षा पद्धतींचा अवलंब केला जाईल.
हेही वाचा:बिल गेट्स ते बोम किम, हॉवर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या 7 प्रसिद्ध व्यक्ती
देशभरातल्या खासगी शाळासुद्धा या नव्या प्रयोगात सहभागी होणार आहेत. 2024 पर्यंत cbse च्या सगळ्या शाळांमध्ये ही नवी मूल्यमापन पद्धती आलेली असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, CBSE, School student